खशोगी हत्या दडपणे हे सर्वात भीषण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 05:00 AM2018-10-25T05:00:54+5:302018-10-25T05:01:06+5:30

प्रख्यात पत्रकार जमाल खशोगी यांचे हत्या प्रकरण ज्या पद्धतीने दडपण्यात येत होते इतका भीषण प्रयत्न याआधी इतिहासात कधीही झाला नव्हता, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.

This is the most horrific case of suppressing murder | खशोगी हत्या दडपणे हे सर्वात भीषण प्रकरण

खशोगी हत्या दडपणे हे सर्वात भीषण प्रकरण

वॉशिंग्टन : प्रख्यात पत्रकार जमाल खशोगी यांचे हत्या प्रकरण ज्या पद्धतीने दडपण्यात येत होते इतका भीषण प्रयत्न याआधी इतिहासात कधीही झाला नव्हता, असे मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात गुंतलेल्या सौदी अरेबियाच्या काही अधिकाऱ्यांचा व्हिसाही अमेरिकेने रद्द केला आहे.
वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक असलेले पत्रकार जमाल खगोशी हे तुर्कस्थानातील एका महिलेशी विवाह करणार होते. त्यासंदर्भातील कागदपत्रे आणण्यासाठी तुर्कस्थानमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात २ आॅक्टोबर रोजी ते गेले होते; मात्र त्यानंतर खशोगी बेपत्ताच झाले. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप आरडाओरड झाली. तेव्हा सौदी अरेबियाने असे स्पष्टीकरण दिले की, खशोगी दूतावासाच्या मागच्या दाराने निघून गेले होते; पण प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून सौदी अरेबियाने आपल्या आधीच्या भूमिकेपासून घूमजाव केले. दूतावासात झालेल्या हाणामारीत खशोगी मरण पावले, असे सौदी अरेबियाने कबूल केले. एखादे प्रकरण दडपून टाकण्याचा इतका भीषण प्रयत्न इतिहासात याआधी कधी घडला नसेल, असे ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले. खशोगी हत्या प्रकरणाने सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सालेम यांची प्रतिमा कलंकित झाली आहे.
>सीआयएच्या प्रमुख तुर्कस्तानला रवाना
खशोगी यांच्या हत्या प्रकरणात गुंतलेल्या सौदी अरेबियाच्या काही अधिकाºयांचा अमेरिका व्हिसा रद्द करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री माई पॉम्पेओ यांनी मंगळवारी सांगितले. त्यातील दोषींवर कारवाई होण्यासाठी अमेरिका शिकस्तीचे प्रयत्न करणार आहे. खशोगी प्रकरणाची माहिती घेण्यासाठी ट्रम्प यांनी सीआयएच्या संचालक गिना हास्पेल यांना तुर्कस्तानला पाठविले.

Web Title: This is the most horrific case of suppressing murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.