स्थलांतरितांनी हंगेरी सोडले

By Admin | Published: September 6, 2015 04:50 AM2015-09-06T04:50:10+5:302015-09-06T04:50:10+5:30

गेले दोन दिवस हंगेरीत अडकून पडलेल्या सीरियन लोकांचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. हंगेरियन सरकार व त्यांच्या पंतप्रधानांनी कितीही कडक धोरण अवलंबले तरीही स्थलांतरितांनी

Migrants leave Hungary | स्थलांतरितांनी हंगेरी सोडले

स्थलांतरितांनी हंगेरी सोडले

googlenewsNext

व्हिएन्ना : गेले दोन दिवस हंगेरीत अडकून पडलेल्या सीरियन लोकांचा पेच आता सुटण्याच्या मार्गावर आहे. हंगेरियन सरकार व त्यांच्या पंतप्रधानांनी कितीही कडक धोरण अवलंबले तरीही स्थलांतरितांनी आपला निर्धार कायम ठेवला होता. राजधानी बुडापेस्टपासून सरळ चालत आॅस्ट्रियाच्या दिशेने जाण्यास सुरुवात केल्यानंतर रात्री एक वाजता आॅस्ट्रियाच्या दिशेने बसेस सोडण्यात आल्या व अखेर ही कोंडी फुटली.
तसेच शरणार्थी शिबिरातील लोकांना घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. रात्री दोन ते पाच या काळात ४० बसेसनी व्हिएन्नाच्या दिशेने प्रस्थान केले. रविवारपर्यंत १०,००० लोक आॅस्ट्रियात जातील असा अंदाज आहे.
हंगेरीमध्ये झालेल्या प्रश्नाची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भूमिका आॅस्ट्रिया आणि जर्मनीने घेतल्यामुळे स्थलांतरितांना हंगेरीची सीमा ओलांडता आली. सीरिया-तुर्की-ग्रीस या प्रवासामध्ये आजवर २,६०० लोकांनी प्राण गमावले आहेत. पश्चिम युरोपातील देशांनी सीरियन शरणार्थींना स्वीकारावे, असा दबाव युरोपियन युनियनवर गेले अनेक दिवस येत होता.

टाळ््या आणि अश्रू
व्हिएन्नाच्या दिशेने जाणाऱ्या बसेस पाहिल्यावर स्थलांतरितांनी एका डोळ््यात आनंद व दुसऱ्या डोळ््यात अश्रू अशी स्थिती अनुभवली. ब्लँकेटमध्ये गुंडाळलेली लहान मुले, स्त्रिया आणि अपंगांनीही आनंदाने टाळ््या वाजवून बसेसचे स्वागत केले.
यावेळेस सर्वांच्या तोंडून केवळ ‘थँक्यू आॅस्ट्रिया’ असेच शब्द बाहेर आले. आयलान कुर्दी या तीन वर्षांच्या बालकाचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर ‘वेलकम रेफ्युजी’ अशी मोहीमच युरोपात सुरू झाली आहे. तसा हॅशटॅगही टिष्ट्वटरवर तयार केला गेला.
आॅस्ट्रियातील लोकांनीही जागोजागी ‘रेफ्युजीस वेलकम’ अशा पाट्या रस्त्यांवर लावून जगाला मानवतेचे दर्शन घडविले.

एकत्रित येण्याची गरज
संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्थलांतरासाठी नेमलेले विशेष प्रतिनिधी पीटर सदरलँड यांनी स्थलांतराच्या प्रश्नावर युरोपियन देशांच्या नेत्यांचे कान उपटले आहेत. स्थलांतराचा प्रश्न सोडवायचा असेल तर एकत्र आलेच पाहिजे. सर्वांनी हातात हात घेऊन काम केल्याशिवाय स्थलांतरितांना न्याय देता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आखाती देश गप्प का ?
देशोधडीला लागलेल्या सीरियन्सना सामावून घेण्याची जबाबदारी जर्मनी व युरोपातील देशांवर टाकली जात आहे. मात्र गेले दोन दिवस जगभरात एक नवा प्रश्न विचारला जात आहे. श्रीमंत आखाती देश या लोकांना का सामावून घेत नाहीत, असा सूर उमटत आहे.
आजवर सीरियन लोकांनी लेबनॉन आणि तुर्कस्थानात आश्रय घेतला आहे. त्याचप्रमाणे जॉर्डन, इराक आणि इजिप्तमध्येही ते गेले. मात्र सौदी अरेबिया, यूएई, कतार, कुवैत आणि बहारीन यांच्यापैकी कोणीही त्यांना सामावून घेण्यास
पुढे आलेले नाही.
सीरियन लोकांना व्हिसाविना अल्जेरिया, मॉरिशियाना, सुदान आणि येमेनमध्ये जाण्याची परवानगी आहे. मात्र हे देश त्यांच्या अंतर्गत प्रश्नांशी व गरिबीशी झगडत आहेत. सुदानमध्ये दक्षिण व उत्तर दोन्ही देशांमध्ये अजूनही बेदिली आहे आणि येमेनची स्थिती हौती बंडखोरांमुळे व सौदीच्या हस्तक्षेपामुळे वाईट झालेली आहे. त्यामुळे ते येमेनकडे जाऊ शकत नाहीत.
सौदी अरेबियाने याबाबतीत निराशा केल्याचे उघड बोलले जात आहे. कालच सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल्ला अझीझ यांनी अमेरिकेत जाऊन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांची भेट घेतली़ त्या दोघांनी येमेनमधील बंडखोर, सीरियातील स्थिती आणि इराण-अमेरिका अणू करारावर चर्चा केली.

सरणार कधी रण ?
सुमारे दोन ते तीन महिने सीरियन नागरिक तुर्कस्थान-ग्रीस-मॅसिडोनिया-सर्बिया-हंगेरी असा प्रवास करीत आहेत. ज्या जर्मनीच्या आशेने आपण युरोपात आलो ती आशा खरेच पूर्ण होईल का, हा प्रश्न अद्याप त्यांच्या मनामध्ये आहे.

Web Title: Migrants leave Hungary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.