मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 11:13 AM2019-03-01T11:13:47+5:302019-03-01T11:15:03+5:30

पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे.

Masood Azhar is in Pakistan -Pakistan accept | मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

मसूद अझहर आजारी, घरातून बाहेर पडू शकत नाही, पाकिस्तानची कबुली 

googlenewsNext

इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची चौफेर कोंडी झाली आहे. एकीकडे पाकिस्तान शांततेच्या बाता मारत असताना दुसरीकडे मसूद अझहरबाबतचा त्यांचा दुटप्पीपणा उघड झाला. आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतावादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान पुरावे  मागत आहे. तर दुसरीकडे मसूद अझहर हा पाकिस्तानातच असून, तो आजारी असल्याने घरातून बाहेरही पडू शकत नाही, असा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कबूल केले आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ''माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार मसूद अझहर हा पाकिस्तानमध्ये  आहे. तसेच सध्या तो खूप आजारी आहे. त्याचा आजार गंभीर असल्याने तो घराबाहेरही पडू शकत नाही.'' 

भारताने केलेल्या आरोपानंतर पाकिस्तान मसूद अझहर याला अटक करणार का? असे विचारले असता कुरैशी यांनी सांगितले की,"भारताकडे यासंदर्भातील पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. जेणेकरून पाकिस्तानी जनता आणि न्यायालयाच्या शंकांचे निरसन करता येईल.'' दरम्यान, पुलामावा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एक डॉजियर सोपववे आहेत.  त्यात पुलवामा येथील हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याचे सबळ पुरावे देण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरू आहे. 

पुलावामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. जैश ए मोहम्मदच्या धोरणांनुसार हल्लेखोर आदिल डार याने एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध केला होता. ज्यात त्याने आपण जैश ए मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे मान्य केले होते.  

Web Title: Masood Azhar is in Pakistan -Pakistan accept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.