Pakistan New Army Chief : असीम मुनीर होणार पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, ISI चे होते प्रमुख 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:05 PM2022-11-24T14:05:14+5:302022-11-24T14:06:06+5:30

Pakistan New Army Chief : पाकिस्तान लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत असीम मुनीर यांचे नाव आघाडीवर होते.

Lieutenant General Asim Munir Is Pakistan New Army Chief | Pakistan New Army Chief : असीम मुनीर होणार पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, ISI चे होते प्रमुख 

Pakistan New Army Chief : असीम मुनीर होणार पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख, ISI चे होते प्रमुख 

googlenewsNext

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे आता पाकिस्ताने नवे लष्करप्रमुख होणार आहेत. सध्याचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची जागा असीम मुनीर घेणार आहेत. जनरल कमर जावेद बाजवा हे 29 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना जॉइंट चीफ ऑफ स्टाफ म्हणून आणि लेफ्टनंट जनरल सय्यद असीम मुनीर यांना लष्करप्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे."

पाकिस्तान लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत असीम मुनीर यांचे नाव आघाडीवर होते. विशेष म्हणजे, लेफ्टनंट जनरल म्हणून असीम मुनीर यांचा चार वर्षांचा कार्यकाळ जनरल बाजवा यांच्या निवृत्तीच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच 27 नोव्हेंबर रोजी संपणार आहे, मात्र लष्करप्रमुखपद त्यांच्या निवृत्तीपूर्वीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांना सेवेत तीन वर्षांची मुदतवाढ दिली जाईल.

लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांना फ्रंटियर फोर्स रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. जनरल बाजवा यांच्या नेतृत्वाखाली ब्रिगेडियर म्हणून दलाची कमान हाती घेतल्यापासून असीम मुनीर हे जनरल बाजवा यांचे जवळचे सहकारी आहेत. जनरल बाजवा हे त्यावेळी एक्स कॉर्प्सचे कमांडर होते.

असीम मुनीर हे आयएसआय प्रमुख होते
2017 च्या सुरुवातीला असीम मुनीर यांना लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आणि पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना आयएसआय (ISI) प्रमुख बनवण्यात आले. मात्र, आयएसआयचे अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ हा आतापर्यंतचा सर्वात लहान ठरला. कारण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आग्रहावरून आठ महिन्यांच्या आत त्यांच्या जागी लेफ्टनंट-जनरल फैझ हमीद यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Web Title: Lieutenant General Asim Munir Is Pakistan New Army Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.