लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला; 40 जण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:06 AM2019-07-03T09:06:23+5:302019-07-03T09:06:47+5:30

त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तारला जबाबदार धरलं आहे. 

Libya air strike hits migrant detention center, 40 people killed | लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला; 40 जण ठार 

लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला; 40 जण ठार 

Next

नवी दिल्ली - लीबियातील अवैध प्रवासी केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्यात 40 जणांना मृत्यू झाला आहे तर 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. लीबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अजून स्पष्टता नाही. स्थानिक माध्यमानुसार लीबियाची राजधानी त्रिपोली येथील तजौरामध्ये हा हल्ला झाला. लीबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटोमध्ये हल्ल्यानंतर आफ्रिकन प्रवासी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

रॉयटर्सनुसार सरकारी आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते मालेक मर्सेक यांनी सांगितले की, या हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 लोक जखमी झालेत. त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तारला जबाबदार धरलं आहे. 

अवैधरित्या इटलीला जाणाऱ्या आफ्रिकन प्रवाशांसाठी लीबिया मुख्य केंद्र आहे. याठिकाणाहून गरिब आणि युद्ध परिस्थितीमुळे स्थलांतरित करणारे आफ्रिकन इटलीला पलायन करतात. मात्र या प्रक्रियेत अनेक प्रवाशांना लीबियाचे पोलीस अटक करतात. या प्रक्रियेला यूरोपियन यूनियनदेखील विरोध केला आहे. अवैधरित्या प्रवाशांना लीबियात वास्तव्य करण्यास बंदी आहे. 

लीबियामध्ये अशा अवैध प्रवाशांना कैदेत ठेवलं जातं. या कैदेत ठेवलेल्या प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला आहे. यूएन सर्मपित सरकारने हा हल्ला खलीफा हफ्तार याचे समर्थन करणाऱ्या लीबियन नॅशनल आर्मीने केला आहे. 

Web Title: Libya air strike hits migrant detention center, 40 people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.