महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने

By admin | Published: March 26, 2015 01:11 AM2015-03-26T01:11:25+5:302015-03-26T01:11:25+5:30

ताशी २३ हजार मीटर या वेगाने अंतराळात घिरट्या घेत असून येत्या शुक्रवारी हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावत पृथ्वीला स्पर्श करणार आहे.

Large asteroid towards Earth | महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने

महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने

Next

लंडन : शुक्रवारी पृथ्वीवर एक भले मोठे संकट येऊ घातले आहे. एक हजार मीटर रुंदीचा महाकाय लघुग्रह (अ‍ॅस्ट्रॉईड/खडक) ताशी २३ हजार मीटर या वेगाने अंतराळात घिरट्या घेत असून येत्या शुक्रवारी हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावत पृथ्वीला स्पर्श करणार आहे. २०१४०-वाय-बी-३५ नामक हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर मोठा हाहाकार उडू शकतो. हवामानात बदल होऊ शकतो. एवढेच नाही, तर या लघुग्रहाचा पृथ्वीला पुसटसा स्पर्श झाल्यास भूकंप आणि त्सुनामी यासारख्या विध्वंसक घटना घडू शकतात. एवढेच नाही तर एखादा देश उद्वस्त होऊ शकतो.
नेहमी कोसळणाऱ्या उल्कांपेक्षा या खडकाचा आकार खूप मोठा आहे. असा महाकाय खडक क्वचित आढळतो. २.८ दशलक्ष मैल अंतर पार करून हा लघुग्रह पृथ्वीवर धडकेल, असा अंदाज असल्याचे वृत्त ‘नासा’च्या हवाल्याने देण्यात आले आहे.
२०१४ च्या अखेरीस कॅटालिना स्काय सर्व्हेत ही अंतराळ वस्तू आढळली होती. या महाकाय वस्तूच्या हालचालीवर खगोलशास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत. (वृत्तसंस्था)

४हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास वातावरणात कचऱ्याचे प्रचंड लोळ पसरतील. त्यामुळे हवामानात बदल होईल आणि परिणामी पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
४या लघुग्रहाच्या अत्यंत थोड्याशा प्रभावाने शहरे उद्ध्वस्त होतील.

Web Title: Large asteroid towards Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.