भारतातील नेतृत्वाने भडक विधानांविरुद्ध बोलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 03:20 AM2016-03-11T03:20:50+5:302016-03-11T03:20:50+5:30

भारतात केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक़ विधानांविरुद्ध भारतीय नेतृत्वाने स्पष्टपणे बोलायला हवे, असे मत धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

India's leadership should speak against bigger laws | भारतातील नेतृत्वाने भडक विधानांविरुद्ध बोलावे

भारतातील नेतृत्वाने भडक विधानांविरुद्ध बोलावे

Next

वॉशिंग्टन : भारतात केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक़ विधानांविरुद्ध भारतीय नेतृत्वाने स्पष्टपणे बोलायला हवे, असे मत धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे तीन सदस्यीय शिष्टमंडळ याच आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येणार होते. पण, त्यांना भारताने व्हिसा नाकारला. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले आहे.
धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकी आयोगाच्या आयुक्त कॅटरिना लांटोस स्वेट याबाबत बोलताना म्हणाल्या की, लोकशाही व्यवस्था आणि १२५ कोटी लोकसंख्या असणारा भारत हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पण, या देशाने एक मोठी संधी गमावली आहे. अर्थात यातील काही बाबी माझ्या आकलनापलिकडील आहेत. भारताने २००१, २००९ नंतर पुन्हा एकदा या प्रकारे व्हिसा नाकारला आहे. लांटोस स्वेट म्हणाल्या की, काही भारतीय राज्यांत अतिशय कठीण कायदे आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: India's leadership should speak against bigger laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.