india wins the seat to human rights council at united nations with the highest votes among all candidates | संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय
संयुक्त राष्ट्रात मानवाधिकार परिषदेचा सदस्य म्हणून भारताची निवड, 188 मतांनी ऐतिहासिक विजय

वॉशिंग्टन- संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकार परिषदेत भारताची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या 193 सदस्यांच्या महासभेत पुढच्या तीन वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेचे सदस्य म्हणून भारताची नेमणूक केली आहे. मानवाधिकार परिषदेचे सदस्य गुप्त मतदानाद्वारे बहुमताच्या आधारे निवडले जातात.

परिषदेत निवड होण्यासाठी कोणत्याही देशाला कमीत कमी 97 मतं आवश्यक असतात. भारताला या परिषदेत 188 मतांनी विजय मिळाला आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रासाठी मानवाधिकार परिषदेत एकूण पाच जागा होत्या, त्यासाठी भारताबरोबरच बहरिन, बांगलादेश, फिजी, फिलिपिन्स यांनी अर्ज केला होता. नव्या सदस्यांचा कार्यकाळ एक जानेवारी 2019पासून तीन वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे. भारतात 2011-14 आणि 2014-17 असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे. भारताचा अंतिम कार्यकाळ 31 डिसेंबर 2017ला संपला होता.  


Web Title: india wins the seat to human rights council at united nations with the highest votes among all candidates
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.