अबुधाबीत भारतीयाला १८ कोटींची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:52 PM2018-06-03T23:52:28+5:302018-06-03T23:52:28+5:30

अबुधाबीमध्ये एका भारतीयाला चक्क १८ कोटी रुपयांची (१ कोटी दि-हाम) लॉटरी लागली आहे. या भाग्यवान भारतीयाचे नाव डिक्सन कट्टितरा अब्राहम असे असून तो नायजेरियामध्ये राहातो व तो नोकरीधंद्यासाठी अबुधाबीत आला आहे.

India has a Lottery of 18 crores in Abu Dhabi | अबुधाबीत भारतीयाला १८ कोटींची लॉटरी

अबुधाबीत भारतीयाला १८ कोटींची लॉटरी

Next

दुबई : अबुधाबीमध्ये एका भारतीयाला चक्क १८ कोटी रुपयांची (१ कोटी दि-हाम) लॉटरी लागली आहे. या भाग्यवान भारतीयाचे नाव डिक्सन कट्टितरा अब्राहम असे असून तो नायजेरियामध्ये राहातो व तो नोकरीधंद्यासाठी अबुधाबीत आला आहे. संयुक्त अरब अमिरातीतील देशांमध्ये गेल्या काही महिन्यांत काही भारतीयांना मोठमोठ्या रकमांच्या लॉटरी लागल्या आहेत.
बिग लॉटरी असे या लॉटरीचे नाव असून तिच्या सोडतीचा निकाल अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आगमन कक्षात रविवारी सकाळी झालेल्या एका कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. या लॉटरीच्या सोडतीत एकुण नऊ बक्षिसे देण्यात आली. त्या भाग्यवंतांमध्ये पाच भारतीय , तीन पाकिस्तानी व संयुक्त अरब अमिरतीमधील एका नागरिकाचा समावेश आहे. अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडून गेल्या अनेक वर्षांपासून बिग लॉटरी चालविली जाते व ती विलक्षण लोकप्रिय देखील आहे. एप्रिल महिन्यामध्ये दुबईमधील एका भारतीय वाहनचालकाला १.२. कोटी दिºहामची लॉटरी अबुधाबीमध्ये लागली होती. जानेवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतील एका भारतीयालाही १.२ कोटी दिºहामची लॉटरी लागली होती. संयुक्त अरब अमिरातीतील देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश अशा अनेक देशांतून असंख्य माणसे नोकरीधंद्यासाठी आलेली आहेत. यापैकी काही जणांना इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागल्यामुळे त्यांचे नशिब फळफळले आहे.

Web Title: India has a Lottery of 18 crores in Abu Dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dubaiदुबई