चिनी रंगभूमीवर हिंदी मातीचा महाल

By admin | Published: May 18, 2017 06:39 PM2017-05-18T18:39:13+5:302017-05-18T18:48:46+5:30

आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला.

Hindi mausoleum on Chinese stage | चिनी रंगभूमीवर हिंदी मातीचा महाल

चिनी रंगभूमीवर हिंदी मातीचा महाल

Next
>ऑनलाइन लोकमत
शांघाय, दि. 18 - आपल्याच देशात अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणा-या भारतीय नाट्यसृष्टीसाठी 22 एप्रिल हा दिवस ऐतिहासीक ठरला. कारण चीनच्या शांघाय येथे महान कवी कालिदास यांच्या जीवनावर आधारित प्रसिद्ध नाटककार मोहन राकेश( 1925-1972) यांच्या "आषाढ़ का एक दिन" या नाटकाचा यशस्वी प्रयोग सादर करण्यात आला. आधुनिक शांघायच्या इतिहासात  एखाद्या हिंदी नाटकाचा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ होती. 
 
शांघायसारख्या व्यस्त शहरात "आषाढ़ का एक दिन" या नाटकाच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक वर्षांपासून आपली माती, आपल्या भाषेपासून दूर राहूनही हिंदी रंगभूमीवर प्रेम करणा-यांची  संख्या कमी झाली नसल्याचं दाखवून दिलं. शांघायमधल्या यशानंतर आता बिजिंग आणि ग्वॉगजौ या शहरांतूनही नाटकाचं आयोजन करण्याचा आग्रह धरला जात आहे. 

Web Title: Hindi mausoleum on Chinese stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.