हमासने इस्रायलवर ५००० रॉकेट डागले, १०० जण गंभीर जखमी; PM नेतन्याहू यांनी बोलावली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:06 PM2023-10-07T15:06:31+5:302023-10-07T15:08:29+5:30

रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलच्या विविध भागात १००हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

Hamas fires 5,000 rockets, killing five, wounding 100, including Israel's mayor | हमासने इस्रायलवर ५००० रॉकेट डागले, १०० जण गंभीर जखमी; PM नेतन्याहू यांनी बोलावली बैठक

हमासने इस्रायलवर ५००० रॉकेट डागले, १०० जण गंभीर जखमी; PM नेतन्याहू यांनी बोलावली बैठक

googlenewsNext

हमासच्या वारंवार होणाऱ्या रॉकेट हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या इस्रायलने युद्धासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. वृत्तानुसार, हमासने गाझा येथून इस्रायलवर हल्ले सुरू केले. अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत ५००० रॉकेट डागण्यात आले यावरून या हल्ल्याचे प्रमाण मोजता येते. या हल्ल्याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हमासच्या सशस्त्र शाखेने ‘ऑपरेशन अल-अक्सा फ्लड’ सुरू केल्याची घोषणा केली.

हमासच्या हल्ल्यात इस्रायल शहरातील महापौरांचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे. रॉकेट हल्ल्यांमुळे इस्रायलच्या विविध भागात १००हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान महामहिम बेंजामिन नेतन्याहू यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. लष्कराने सांगितले की, इस्रायलचे सुरक्षा दल युद्धासाठी तयार आहेत. गाझामधून इस्रायलच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले झाले आहेत. वेगवेगळ्या सीमा भागातूनही दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले आहेत.

सदर हल्ल्यांबाबत, हमासने सांगितले की त्यांनी २० मिनिटांच्या पहिल्या हल्ल्यात" ५००० हून अधिक रॉकेट डागले. इस्रायलने 'युद्धासाठी तयार' असल्याचे सांगितले आणि हमासला आपल्या कृतीची मोठी किंमत चुकवावी लागेल असे म्हटले. पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास इस्लामिक जिहादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या १५ वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे २०२१ मध्ये झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. डॅनाडेन हल्ल्यानंतर संकट अधिक गडद होण्याची भीती असताना, इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी ट्विट केले की, ज्यूंच्या सुट्टीदरम्यान गाझामधून इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. हमासच्या दहशतवाद्यांकडून रॉकेट आणि जमिनीवर घुसखोरीही झाली आहे. ते म्हणाले की, परिस्थिती सामान्य नाही, परंतु इस्रायल जिंकेल आणि संकट मागे टाकण्यात यशस्वी होईल.

सोशल मीडियावर हमासच्या बंदूकधाऱ्यांचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये इस्रायली लष्कराची जप्त केलेली वाहने दिसत आहेत. हमास गटाचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसताना दिसत आहेत. इस्रायली लष्कराने सांगितले की, मोठ्या संख्येने दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले आहेत. इस्रायल हमासला दहशतवादी गट मानतो. Sderot येथे अनेक इस्रायली नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Hamas fires 5,000 rockets, killing five, wounding 100, including Israel's mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.