girl caught herself in plan made for get boyfriend | बॉयफ्रेंड मिळावा म्हणून तरुणीने लढवलेल्या शक्कलीमुळे स्वत:च आली गोत्यात

ठळक मुद्देतिचा हा किस्सा तिने स्वत: ट्विटवर शेअर केला आहे.या घटनेला आता ६ वर्ष पुर्ण झाली आहेत.एका मुलीने आपल्याला छान बॉयफ्रेंड मिळावा याकरता एक वेगळीच शक्कल लढवली.

नॉर्थ केरलीन : गर्लफ्रेंड बनवण्यासाठी मुलं कितीतरी युक्त्या आखतात. पण जर बॉयफ्रेंड बनवण्यासाठी एखाद्या मुलीने एक हटके युक्ती आखली असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना. पण एका मुलीने आपल्याला छान बॉयफ्रेंड मिळावा याकरता एक वेगळीच शक्कल लढवली. जी शक्कल आता सोशल मीडियावर बरीच व्हायरल होतेय. 

बझफिडने दिलेल्या वृत्तानुसार, हॅली रॉबिन्सने तिचा हा किस्सा स्वत: ट्विटवर शेअर केला आहे. तिच्या पोस्टप्रमाणे ६ वर्षांपूर्वी बॉयफ्रेंड मिळावा याकरता तिने एक कल्पना आखली होती. त्यानुसार तिने एका चेंडूवर तिचं नाव आणि नंबर लिहून तो चेंडू समुद्रात फेकला. पण त्यावेळेस तिला कोणीच संपर्क साधला नाही. आता हॅली ही घटना पार विसरूनही गेली होती. पण ६ वर्षांनंतर तिला एक मॅसेज आला. या मॅसेजनुसार त्या मुलाचं नाव एडम असं होतं. त्याने मॅसेजमध्ये लिहिलं की मला एक सॉफ्टबॉल समुद्र किनारी मिळाला त्यावरून मी हा मॅसेज केला. ज्यामुळे हॅली पूर्णत: हादरून गेली होती. सहा वर्षांनंतर समुद्रात फेकलेला चेंडू कसा काय सापडू शकतो यावरून ती गोंधळात पडली.  

एडमसोबत तिने गप्पा सुरू केल्या. तिने हा प्रकार ट्विटवर अपलोडही केला. त्यानुसार अनेकांनी ही स्टोरी शेअर केली. बघता बघता त्यांची ही अनोखी लव्हस्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. अनेकांनी त्यांचेही असेच किस्से शेअर केले.  

पण खरा ट्विस्ट तर अजून पुढे आहे. त्यांच्यात संवाद वाढला. त्यांनी एकमेंकाशी शेअरिंग सुरू केलं. अशातच हॅलीने एडमचा स्नॅपचॅटचा आयडी मागितला आणि स्नॅपचॅटमुळे त्यांची लव्हस्टोरी इथंच थांबली.  एडमने स्नॅपचॅट आयडी दिला. त्यानुसार हॅलीने त्या आयडीवर जाऊन पोस्ट आणि फोटोज चेक केले तेव्हा तिला धक्काच बसला. कारण एडम हा मुलगा नसून मुलगी होती आणि स्नॅपचॅटवर एश्ले असं नाव होतं. एश्लेने त्यानंतर हैलीला पुन्हा मॅसेज केला, ‘सॉरी तू शेवटी मला पकडलंच. मी एडम नाहीए. मी मुलगा बनून बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण आपण आता चांगल्या मैत्रिणी बनू शकतो.’ हॅलीने हा प्रकारही सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यावर अनेकांनी त्यांच्या या लव्हस्टोरीची खिल्लीही उडवली आहे. 

ऐश्लेचं खरं नाव केल्सी आहे, जी नॉर्थ कॅरेलीनमध्ये राहते. तिने म्हटलं आहे की, तिला हा बॉल ६ वर्षांपूर्वी एका बीचवर सापडला होा. पण त्यावेळेस तिने फार लक्ष दिलं नाही. ६ वर्षांनंतर जेव्हा घराची साफ सफाई केली तेव्हा हा बॉल तिला सापडला. म्हणून बॉलवरील नंबरवरून एश्लेने हॅलीला मॅसेज केला. आणि मुख्य म्हणजे एश्लेने मुलगा बनून हॅलीशी बोलण्याचा प्रयत्न केला कारण तिलाही माहित नव्हतं की नक्की समोर कोण आहे.


Web Title: girl caught herself in plan made for get boyfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.