अखेर रहस्यमयी पडदा हटला! मेक्सिकोने संसदेतून एलियन्सचे मृतदेह जगासमोर ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 05:29 PM2023-09-13T17:29:34+5:302023-09-13T17:36:13+5:30

मेक्सिकोच्या संसदेत आज दोन एलियनचे मृतदेह ममीस्वरुपात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. युएफओ तज्ञ जेमी मौसान यांनी या एलियन्सच्या मृतदेहांचे अधिकृत अनावरण केले.

Finally, the mysterious curtain is removed! Aliens' bodies kept in Mexico's parliament, 1000 years ago... | अखेर रहस्यमयी पडदा हटला! मेक्सिकोने संसदेतून एलियन्सचे मृतदेह जगासमोर ठेवले

अखेर रहस्यमयी पडदा हटला! मेक्सिकोने संसदेतून एलियन्सचे मृतदेह जगासमोर ठेवले

googlenewsNext

लॅटिन अमेरिकी देश मेक्सिकोच्या संसदेत आज जगाला हादरा देणारी घटना घडली आहे. परग्रहवासी आहेत, अशी आपली समज आजवर आहे, परंतू मेक्सिकोने त्याचे पुरावे एलियन्सच्या सापडलेल्या मृतदेहांद्वारे दिले आहेत. यामुळे येत्या काळात एलियन आणि युएफओबाबत लोकांमध्ये आणखी उत्सुकता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मेक्सिकोच्या संसदेत आज दोन एलियनचे मृतदेह ममीस्वरुपात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. युएफओ तज्ञ जेमी मौसान यांनी या एलियन्सच्या मृतदेहांचे अधिकृत अनावरण केले. संसदेत याबाबतच्या अधिकृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यूएस नेव्हीचे माजी पायलट रायन ग्रेव्हज देखील उपस्थित होते. फ्लाइट दरम्यान त्यांना  यूएफओ दिसले होते, असा दावा त्यांनी केला होता. 

हे मृतदेह आकाराने लहान असून पर्यवेक्षकांच्या निरीक्षणांसाठी ठेवले गेले आहेत. ममी बनलेले हे मृदेह जवळपास १००० वर्षांपूर्वीचे आहेत आणि हे पेरूच्या कुस्कोमध्य़े सापडले आहेत, असा दावा करण्यात आला आहे. मेक्सिकोच्या एका विद्यापीठामध्ये या युएफओच्या नमुन्यांचे अध्ययन करण्यात आले आहे. या मृतदेहांचे रेडिओकार्बन डेटिंगच्या आधारे डीएनएचे पुरावे गोळा करण्यात देखील यश आल्याचा वैज्ञानिकांनी दावा केला आहे. 

हे मृतदेह आपल्या पृथ्वीचा हिस्सा नाहीत. ते एका खाणीमध्ये सापडले आहेत. अमेरिकेप्रमाणेच, मेक्सिकन खासदारांनीही UFO वर सुनावणी आयोजित केली आहे. मंगळवारी संसदेत 'मानवेतर' परकीय प्राणी असल्याचे मानले जाणारे दोन मृतदेह प्रदर्शित करण्यात आले, असे मौसान यांनी म्हटले आहे. मौसान एक पत्रकार देखील आहेत. ते बऱ्याच काळापासून परग्रहवासींयांवर काम करत आहेत. 
 

Web Title: Finally, the mysterious curtain is removed! Aliens' bodies kept in Mexico's parliament, 1000 years ago...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.