मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 03:24 PM2018-11-27T15:24:43+5:302018-11-27T15:26:57+5:30

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे.

elon musk says there is a 70 probability he will go to mars | मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट'

मंगळावर जगण्याची शक्यता फारच कमी, तरीही एलॉन मस्क यांना खुणावतोय 'रेड प्लॅनेट'

googlenewsNext

(Image Creadit : Extra.ie)

नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे  मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. या यानाच्या यशस्वी लॅन्डींगनंतर सर्वांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे तेथील वातावरणाबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. मंगळावरील जीवन कसे असेल? तिथे मानवाला जगण्यासाठी पोषक असं वातावरण असेल का? असे अनेक प्रश्न जगभरातून उपस्थित होत असतानाच, या प्रश्नांना सामोरं जात स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी मंगळवारी करण्याची इच्छा दर्शवली आहे. पण त्यांना एक भीती सतावत आहे की, मंगळावर गेल्यानंतर किंवा तिथे जात असतानाच जिवंत राहण्याची शक्यता फार कमी आहे. 

सीएनईटीने दिलेल्या रिपोर्टनुसार, रविवारी अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तवाहिनी 'एचबीओ'शी बोलताना मस्क ने सांगितले की, 'काही दिवसांपूर्वीच आम्ही अनेकदा यशस्वी झालो आहोत आणि यामुळे मी फार उत्साहीत आहे.' पुढे बोलताना मस्कने सांगितले की, 'मला मंगळवार जाण्याची इच्छा आहे आणि मी तसे प्रयत्नही करत आहे. त्यासंबंधी मी अनेक व्यक्तींशी चर्चा देखील करत आहे. साधारणतः 70 टक्के शक्यता आहे की मी मंगळावर जाऊ शकतो. पण असे करण्याचे गंभीर परिणाम देखील भोगावे लागू शकतात.'

एलॉन मस्कने सांगितले की, 'मंगळावर मानवाच्या जिवंत राहण्याची शक्यता पृथ्वीपेक्षा फार कमी आहे. त्यामुळे तिथे जात असतानाच किंवा तिथे पोहोचल्यावर मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे.' याचे कारण विचारल्यावर स्पष्टीकरण देत असताना मस्कने सांगितले की, 'अनेक गिर्यारोहक उंच पर्वत, शिखरं सर करण्यासाठी जातात. माउंट एवरेस्टवर अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. पण तरीही अनेक लोक याकडे आव्हान म्हणून पाहतात.'

दरम्यान, ज्यांना मंगळावर जाण्याची इच्छा आहे त्यांनी आतापासूनच बचत करण्याची तयारी सुरू केली पाहिजे, कारण मंगळावर जाण्यासाठी शेकडो-हजारो डॉलर्स रूपये खर्च येणार आहे. असं एलॉन मस्क यांनी सांगितले. एलॉन मस्कची स्पेशशिप कंपनी स्पेसएक्सने पृथ्वीव्यतिरिक्त इतर ग्रहांवर जाण्यासाठी स्टारशिप (याला बीएफआर असंही म्हटलं जातं) डिझाइन केलं आहे. मस्कने असाही दावा केला आहे की, हे यान मंगळावर माणसांसोबतच सामानाची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

स्पेसएक्सने तयार केलेले हे स्टारशिप बूस्टर आणि स्पेसशिप एकत्र करून तयार करण्यात आले आहे. स्पेसएक्सने जुनं स्पेसशिप 'फॉल्कन-9'ला रिप्लेस केलं असून जुन्या स्पेसशिपचं वजन फार जास्त होतं. स्टारशिप अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे की, ते पृथ्वीप्रमाणेच चंद्र आणि मंगळाच्या कक्षांमध्ये सहजपणे ये-जा करू शकेल. 

Web Title: elon musk says there is a 70 probability he will go to mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.