बलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 09:12 AM2018-04-19T09:12:22+5:302018-04-19T09:19:07+5:30

जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ बलात्कार प्रकरणाचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

Don’t politicise rape, says PM Narendra Modi in UK | बलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोला

बलात्काराच्या घटनांचं राजकारण नको, मोदींचा विरोधकांना टोला

लंडन- जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ बलात्कार प्रकरणाचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. बलात्काराच्या घटनांचं राजकारण करू नका, असा टोला विरोधकांना लगावला आहे. ते लंडनमधल्या वेस्टमिंस्टर सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात बोलत होते.

जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं राजकारण करू नका, या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोप झाले नाही पाहिजे. बलात्कारावर घटनेचं राजकारण होणं दुर्दैव आहे. आपण एका मुलीबरोबर अत्याचार कसं सहन करू शकतो,  असंही मोदी म्हणाले. मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, मुलींना प्रश्न विचारणारे आई-वडील मुलांना प्रश्न का विचारत नाहीत ?, मुलींवर अत्याचार करणारा हासुद्धा कोणाचा ना कोणाचा तरी मुलगाच असतो.

पालकांनी मुलांना मुलींचा आदर करण्याची शिकवण देणं गरजेचं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे. तसेच भारताकडून 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी माझ्याशी फोनवर बोलायलाही घाबरत होते, असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.    
काय आहे कठुआ प्रकरण
जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे आठ वर्षे वयाच्या मुलीचं 10 जानेवारीला अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. गुंगीचे औषध दिल्यानंतर या मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अत्याचारानंतर त्या मुलीची हत्या केली. 17 जानेवारीला जंगलात त्या मुलीचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याच्या मुलाला विशालला अटक करण्यात आली. आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत.

Web Title: Don’t politicise rape, says PM Narendra Modi in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.