Donald Trump Awkwardly Attempts To Hold Melania Trump's Hand Again | Watch: मेलेनियामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांसमोर झाली नाचक्की
Watch: मेलेनियामुळे पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांसमोर झाली नाचक्की

ठळक मुद्देट्रम्प यांची कित्येकदा परदेश दौ-यावर असताना पत्नीने पंचाईत केली आहे. सोमवारी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया व्हाईट हाऊसमधून ओहायोला चालले होते.

न्यूयॉर्क - अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचा जगभरात एक वेगळा दरारा आणि सन्मान आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेव्हा परदेश दौ-यावर जातात तेव्हा त्यांचे रेड कार्पेटवर जंगी स्वागत होते. पण याच ट्रम्प यांची कित्येकदा परदेश दौ-यावर असताना पत्नीने पंचाईत केली आहे. महत्वाचं म्हणजे त्यावेळी परिस्थिती अशी असते कि, ट्रम्प यांना स्वत:चा रागही व्यक्त करता येत नाही. सर्व काही मूग गिळून सहन करावे लागते. 

सोमवारी मेलेनियाने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांचा हात हातात घेण्याचा प्रयत्न झिडकारुन लावला. त्यामुळे सर्वांसमक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नाचक्की झाली. ट्रम्प पत्नीचा हात पकडण्याचा प्रयत्न करतात आणि मेलेनिया चतुराईने ते टाळते. हे असे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वीही अनेकदा मेलेनियाने ट्रम्प यांचा हात झिडकारला  आहे.  प्रसारमाध्यम लगेच हा क्षण आपल्या कॅमे-यात कैद करतात. ज्याचे फोटो, व्हिडिओ नंतर व्हायरल होतो.  

सोमवारी ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया व्हाईट हाऊसमधून ओहायोला चालले होते. दोघे अमेरिकेच्या मरीन वन विमानात बसण्यासाठी चाललेले असताना ट्रम्प यांनी मेलेनियाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. मेलेनियाने खांद्यावर पिवळया रंगाचा ओव्हरकोट घेतला होता. तिचे हात त्या कोटच्या आतमध्ये होते. ट्रम्प यांनी हात हातात घेण्याचा प्रयत्न करताच मेलेनियाने त्यांना टाळले. हा सर्व प्रकार कॅमे-यात कैद झाल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनियाच्या पाठीवर हात ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. 

रोममध्ये ट्रम्प यांची झाली होती पंचाईत 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलेनिया ट्रम्पसोबत रोमला पोहोचले असता विमानाच्या दरवाजात उभं राहून उपस्थितांना हात दाखवत होते. यावेळी विमानाच्या पाय-या उतरताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलेनिया ट्रम्पच्या हातात हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र मेलेनिया ट्रम्प यांनी केस नीट करण्याच्या बहाण्याने अप्रत्यक्षपणे नकारच देऊन टाकला. आपली पंचाईत झाल्याचं लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हात पत्नीच्या पाठीवर ठेवत चालण्यास सुरुवात केली आणि सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. या दौ-यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. 

इस्त्रायलमध्येही झाला होता अपमान 
इस्त्रायल दौ-यावर आगमन झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प रेडकार्पेटवरुन चालत असताना त्यांनी पत्नी मेलेनिया ट्रम्पचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. पण मेलेनियाने त्यांचा हात चक्क झटकला होता. नेमके हेच दृश्य कॅमे-याने टिपले आणि मग मेलेनियाने डोनाल्ड ट्रम्प यांचा कसा अपमान केला त्याची चर्चा सुरु झाली होती. बेन गुरीऑन विमानतळावर ही घटना घडली. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी साराही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीच्या स्वागतासाठी विमातळावर आले होते.  


Web Title: Donald Trump Awkwardly Attempts To Hold Melania Trump's Hand Again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.