'कुत्र्याचं भुंकणं आणि डोनाल्ड ट्रंपची धमकी एकसारखीच'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 12:01 PM2017-09-21T12:01:38+5:302017-09-21T12:03:31+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला होता.

'Dog barking and threatening Donald Trump get the same' | 'कुत्र्याचं भुंकणं आणि डोनाल्ड ट्रंपची धमकी एकसारखीच'

'कुत्र्याचं भुंकणं आणि डोनाल्ड ट्रंपची धमकी एकसारखीच'

Next

सोल, दि. 21 - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला होता. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली आहे. 

यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. ट्रंप यांनी दिलेल्या धमकीबाबत पत्रकारांनी विचारले असता, कुत्रे भुंकत असतात पण हत्ती चालत असतो या म्हणीचा त्यांनी वापर केला. कुत्र्यासारखं भुंकण्याने जर आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न पाहात आहेत असं यांग हो म्हणाले. 

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा ट्रंप यांनी केला होता. त्याबाबत विचारलं असता यांग हो यांनी ट्रंप यांच्या सहका-यांची कीव येते असं म्हटलं. अमेरिकेकडून पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी मिळाल्यानंतर उत्तर कोरियाकडून आलेलं हे पहिलं विधान आहे. 
...तर उत्तर कोरियाला संपूर्णपणे नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही - ट्रम्प 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली.

‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’

ट्रम्प यांनी जगातील सहा मोठे देश आणि इराण यांच्यात २०१५ मध्ये झालेल्या अणू कराराला फाडून टाकण्याचा मार्गच जणू मोकळा करून दिला. ट्रम्प म्हणाले, ‘मध्य पूर्वेतील संघर्षात इराणच्या विध्वंसक भूमिकेला आवर घालण्यात हा करार अपयशी ठरला आहे.’ पुढील महिन्यात ट्रम्प काँग्रेसला अहवाल सादर करतील त्यावेळी इराणने कराराचे उल्लंघन केले, असे ते जाहीर करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ‘प्राणघातक राजवटीला आम्ही घातक क्षेपणास्त्रे उभारण्यास देऊन त्यांच्या अस्थिरतेच्या कारवायांना सुरू ठेवू देऊ शकत नाही आणि संभाव्य अणू कार्यक्रमाला ही राजवट संरक्षण देणार असेल तर आम्ही या कराराला बांधील राहू शकत नाहीत,’ असेही ट्रम्प म्हणाले. अगदी मोकळेपणे सांगायचे तर तो करार अमेरिकेसाठी बेचैन करणारा असून, त्याच्याबद्दल तुम्हाला काही ऐकायला मिळाले असेल, असे मला वाटत नाही,’ असेही ते म्हणाले.

Web Title: 'Dog barking and threatening Donald Trump get the same'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.