तुम्हाला हे माहिती आहे का? जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 11:22 AM2018-07-30T11:22:27+5:302018-07-30T11:23:37+5:30

जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो.

Do you know this? Which countries of the world are dependent on oil? | तुम्हाला हे माहिती आहे का? जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे?

तुम्हाला हे माहिती आहे का? जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे?

googlenewsNext

मुंबई- गेल्या दोन शतकांमध्ये संपूर्ण जगाचे लक्ष जर कोणत्या एका पदार्थावर असेल तर ते तेल. या तेलामुळे अनेक देश स्वतःच्या पायावर उभे राहिले तर अनेक देश कोलमडूनही गेले. गेल्या शंभर वर्षांमध्ये युद्धाच्या, यादवी युद्धांच्या, आक्रमणांच्या अनेक कारणांपैकी तेल हे एक अग्रस्थानी असणारे कारण आहे. 

तेल हा ऊर्जानिर्मितीचा महत्त्वाचा स्रोत आहे हे आपल्याला माहीत आहेच. आज सौर, पवन असे ऊर्जानिर्मितीचे स्रोत तयार झाल् असले तरी तेलाचे स्थान अजूनही अबाधित आहे. जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिका दररोज ८३ लाख बॅरल्स तेल निर्यात करतो. त्यानंतर रशिया दररोज ७४ लाख बॅरल्स तेल निर्यात करतो. अमेरिकेने गेल्या काही वर्षांत आपले तेलउत्पादन वेगाने वाढवले आहे, हा वेग पाहाता २०१९ या वर्षी अमेरिका तेलनिर्यात करणारा सर्वात मोठा देश होण्याती शक्यता वर्तवली जात आहे.

तेल उत्पादनात कोण आघाडीवर ?
तेल उत्पादनाचा २०१७ च्या आकडेवारीनुसार विचार करता अमेरिका यामध्ये आघाडीवर असल्याचे दिसते. अमेरिकेने यावर्षी प्रतिदिन १ कोटी ४७ लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन केले आहे. त्यानंतर रशियाने प्रतिदिन १ कोटी १३ लाख बॅरल्स आणि सौदी अरेबियाने प्रतिदिन ९९ लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन केले आहे. त्यानंतर कँनडाने प्रतिदिन ४८ लाख बॅरल्स, इराकने ४७ लाख बॅरल्स प्रतिदिन तेल उत्पादित केले आहे.
इराण ३८ लाख बॅरल्स प्रतिदिन, चीन ३७ लाख बॅरल्स प्रतिदिन, संयुक्त अरब अमिराती २९ लाख, ब्राझील २८ लाख, कुवेत २७, व्हेनेझुएला १९.७ लाख, नाँर्वे १९ लाख बॅरल्स प्रतिदिन एवढे उत्पादन करत २०१७ साली करत होते.

अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून असणे म्हणजे काय ?
केवळ तेलाचे उत्पादन किंवा निर्यात जास्त असणे म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून असते असे नाही. उदाहरणार्थ अमेरिका तेल उत्पादनात व निर्यातीत सतत पहिल्या दोन क्रमांकामध्ये असला तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून नाही. जर अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त महसूल तेलातून येत असेल आणि जीडीपीचा सर्वात जास्त भार तेलावर असेल तर त्यास तेलावर आधारीत अर्थव्यवस्था म्हटले जाते. अमेरिका सध्या या स्थितीत नाही. 

मग तेलावर आधारीत देश आहेत तरी कोणते ? 
जागतिक बँकेच्या २०१२ सालच्या आकडेवारीनुसार विचार करता पुढील देशांची अर्थव्यवस्था तेलावर आधारीत असल्याचे दिसते. 
कुवेत 
लिबिया
सौदी अरेबिया
इराक
अंगोला
ओमान
अझरबैझान
व्हेनेझुएला
चाड
ब्रुनेई
कझाखस्तान
इराण
संयुक्त अरब अमिराती
बाहरिन
इक्वेडोर
 

Web Title: Do you know this? Which countries of the world are dependent on oil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.