लय भारी! जीव वाचवणाऱ्या मास्कची निर्मिती; ब्रिटिश संशोधकांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 06:33 AM2021-08-10T06:33:22+5:302021-08-10T06:35:04+5:30

ब्रिटिश संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान तिसऱ्या लाटेचा सामना करताना भारतासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. 

cpap reduces need for invasive ventilation of covid patients study finds | लय भारी! जीव वाचवणाऱ्या मास्कची निर्मिती; ब्रिटिश संशोधकांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान

लय भारी! जीव वाचवणाऱ्या मास्कची निर्मिती; ब्रिटिश संशोधकांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारतात प्राणवायूच्या अभावी तसेच कृत्रिम श्वसनयंत्रणेच्या (व्हेंटिलेटर) टंचाईमुळे अनेकांना प्राणास मुकावे लागले. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. ब्रिटिश संशोधकांनी शोधलेले तंत्रज्ञान तिसऱ्या लाटेचा सामना करताना भारतासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. 

वार्विक विद्यापीठ आणि बेलफास्टचे क्वीन्स विद्यापीठ या दोन्ही संस्थांमधील संशोधकांनी एपनिया मास्क म्हणजेच ‘कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर’ (सीपीएपी) मशीन गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून रोखण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सीपीएपीच्या या उपचारपद्धतीत उर्ध्व श्वसनमार्गाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी फुफ्फुसांमध्ये हवा भरली जाते. म्हणजेच श्वसननलिकेच्या वरील भाग निष्क्रिय होण्यापासून वाचतो आणि दाबामुळे फुफ्फुसांमध्ये हवाही जाते. 

 एपनिया मास्क महत्त्वाचा
इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर यांच्या मतानुसार १३० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात गेल्या वर्षापर्यंत सुमारे ४० हजार व्हेंटिलेेटर होते. 
सद्य:स्थितीत ही संख्या ५७,५१८ एवढी आहे. 
देशात आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. अशा स्थितीत एपनिया मास्क हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. 

६३ टक्के लोकांना म्हणजेच ३७७ लोकांपैकी २४० लोकांना सीपीएपी उपचारपद्धतीमुळे व्हेंटिलेटरची गरज पडली नाही. 

मृत्यूदर घटतो- सीपीएपी उपचारपद्धती घेणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूदर कमी असल्याचे संशोधनात आढळून आले. 

एका एअर फिल्टरच्या माध्यमातून ट्यूबने शद्ध हवा बाधिताच्या नाक वा तोंडाजवळ एपनिया मास्कने पोहोचते.

रुग्णाला झोपेतही प्राणवायूचा पुरवठा अखंड राहतो. कोरोनाची बाधा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात एपनिया मास्कची उपचारपद्धती उपयुक्त ठरते.  घोरणाऱ्या लोकांसाठी हा मास्क विशेष उपयुक्त ठरणारा आहे. 

सीपीएपी मशीनचे कॉम्प्रेसर हवेच्या दाबात सातत्य ठेवते.

Web Title: cpap reduces need for invasive ventilation of covid patients study finds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.