दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा

By admin | Published: May 26, 2015 11:53 PM2015-05-26T23:53:50+5:302015-05-26T23:53:50+5:30

दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेशी तणाव वाढताच चीनने मंगळवारी आपल्या खुल्या समुद्राच्या संरक्षणासाठी आक्रमक लष्करी धोरण जाहीर केले.

China's aggressive holocaust for the South China Sea | दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा

दक्षिण चीन समुद्रासाठी चीनचा आक्रमक पवित्रा

Next

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रावरून अमेरिकेशी तणाव वाढताच चीनने मंगळवारी आपल्या खुल्या समुद्राच्या संरक्षणासाठी आक्रमक लष्करी धोरण जाहीर केले. त्यानुसार चीनच्या नाविक दलाची शक्ती या समुद्राच्या संरक्षणासाठी वाढणार आहेच शिवाय हिंदी महासागरात भारतीय नौदलाला आव्हानही निर्माण होणार आहे.
दक्षिण समुद्रात दोन दीपगृहे उभारण्याची योजनाही चीनने तयार केली आहे. यामुळे सागरी शेजारी व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया, ब्रुनेई यांच्याशी तणाव वाढणार आहे. संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आमचाच हक्क आहे या दाव्याला व्हिएतनाम, ब्रुनेई, फिलिपाईन्स, मलेशिया यांचा अमेरिकेच्या पाठिंब्याने विरोध आहे. जगात चीनकडे सर्वात मोठे म्हणजे २.३ दशलक्ष खडे सैन्य असून संरक्षणावरील खर्च १४५ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: China's aggressive holocaust for the South China Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.