फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटली, चार जणांचा मृत्यू, 88 जण बेपत्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 05:13 PM2017-12-21T17:13:23+5:302017-12-21T17:17:56+5:30

फिलिपीन्सच्या समुद्रात 251 लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाल्याचे सांगण्यात येते. 

The boat hit the sea of ​​Philippines, killing four people and 88 people missing | फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटली, चार जणांचा मृत्यू, 88 जण बेपत्ता 

फिलिपीन्सच्या समुद्रात बोट उलटली, चार जणांचा मृत्यू, 88 जण बेपत्ता 

Next

मनीला : फिलिपीन्सच्या समुद्रात 251 लोकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत अनेकांना जलसमाधी मिळाल्याचे सांगण्यात येते. 
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती रेडिओ स्टेशनवरुन मिळताच घटनास्थळी बोटीतील नागरिकांना वाचविण्यासाठी तटरक्षक दलाच्या चार बोटी दाखल झाल्या. ही दुर्घटना मनीलापासून जवळपास 70 किलोमीटर पूर्व दिशेला असलेल्या रिअल शहराजळील समुद्रात घडली. तटरक्षक दलाचे प्रवक्ते अर्मांड बलिलो यांनी सांगितले की, या अपघातात अनेकांना आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 88 जण अद्याप बेपत्ता असून 166 जणांना वाचविण्यात यश आल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेतील मृतांचा आकडा वाढविण्याची शक्यता ही त्यांनी वर्तविली आहे. तसेच, बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत. दरम्यान, ही दुर्घटना खराब हवामानामुळे घडल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे. याचबरोबर, बोट ज्यावेळी समुद्रात उलटली त्यावेळी आजू-बाजूला असलेल्या बोटींचा सहारा घेत काही नागरिकांना वाचविण्यात आल्याचेही अर्मांड बलिलो यांनी सांगितले आहे.  




दरम्यान, गेल्या काही महिन्यापूर्वी येथील प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या मोठ्या चक्रीवादळामुळे एक व्यापारी जहाज फिलिपाईन्सजवळ बुडाले होते. या जहाजात 26 भारतीय खलाशी होते. यांपैकी 15 जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले, तर 11 जण अद्यापही बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले होते. 



 



 

Web Title: The boat hit the sea of ​​Philippines, killing four people and 88 people missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात