मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:43 AM2019-06-28T08:43:33+5:302019-06-28T08:52:32+5:30

ओसाका: जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ...

Bilateral Meeting Between Pm narendra Modi And Us President Donald Trump During G20 Summit | मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

मोदी-ट्रम्प भेटीत चार महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

Next

ओसाका: जपानच्या ओसाकामध्ये सुरू असलेल्या जी-20 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. तर मोदींनी या भेटीत चार मुद्द्यांचा उल्लेख केला. यानंतर या दोन्ही नेत्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याशी चर्चा केली. 




डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. 'सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही या विजयास पात्र आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिकेत इराण, 5जी, संरक्षण आणि द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा होईल, असं मोदींनी म्हटलं. 







भारत लोकशाही आणि शांततेसाठी कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. 'सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात आहोत,' असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं. तर गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि अमेरिकेचे संबंध सुधारल्याचं ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिकेची मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून मोदी माझे चांगले मित्र असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं.

Web Title: Bilateral Meeting Between Pm narendra Modi And Us President Donald Trump During G20 Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.