बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 12:24 PM2017-08-04T12:24:35+5:302017-08-04T12:25:40+5:30

इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. 

Barack Obama will appear in Shimon Peres's documentary | बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये

बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये

Next

 

लॉस एंजिलिस, दि. 4 - इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत. 

हॉलिवूड रिपोर्टरनं दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हर स्टॉप ड्रीमिंग :  द लाईफ अँड लेगसी ऑफ शिमोन पेरेस ( 'Never Stop Dreaming: The Life and Legacy of Shimon Peres' ) ,असे डॉक्युमेंट्रीचे नाव आहे. ऑस्कर विजेता रिर्चड ट्रंक या डॉक्युमेंट्रीचं दिग्दर्शक आहेत. 
तर निर्मिती मोरिआ फिल्म्स करत आहे.


2016 मध्ये या डॉक्युमेंट्रीवर काम करण्यास सुरुवात झाली आणि एक्सक्लुझिव्ह अशी  60 तासांची मुलाखत रेकॉर्ड करायची होती. मात्र सप्टेंबर 2016 मध्ये पेरेज यांचे अनपेक्षितपणे निधन झाले. शिमोन पेरेज यांच्यावरील डॉक्युमेंट्री सध्या अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती ट्रंक यांनी दिली आहे. 

शिमोन पेरेज यांच्याविषयीची माहिती 
इस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमोन पेरेज यांचे 28 सप्टेंबर 2016 रोजी निधन झाले. 93 व्या वर्षी पेरेज यांनी अखेरचा श्वास घेतला होता. पेरेज यांनी दोनदा इस्त्रायलचे पंतप्रधानपद भूषवले आहे. यानंतर त्यांनी देशाचे राष्ट्राध्यक्ष पदही सांभाळले.    

- 1994 मध्ये राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्याकाळादरम्यान शिमोन पेरेज यांनी इस्त्रायल-फिलिस्तिनमधील विवाद मिटवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 

- या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना 1994 साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले.


- शिमोन पेरेज यांनी 2007 पासून 2014 पर्यंत देशाचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली

Web Title: Barack Obama will appear in Shimon Peres's documentary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.