America's new defense policy says India's rising world power | अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती
अमेरिकेच्या नव्या संरक्षण धोरणात भारताला म्हटले उगवती जागतिक शक्ती

वॉशिंग्टन - अमेरिकेने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय संरक्षण नीतीमध्ये भारताच्या वाढत्या शक्तीची प्रशंसा करण्यात आली आहे. भारत ही उगवती जागतिक शक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड आणि चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्र विचारात घेऊन ट्रम्प प्रशासनाने सांगितले की, चीनचा वाढता प्रभाव पाहता एनएसएसचद्वारे दक्षिण आशियाई देशातील आपली अखंडता कायम राखण्याचा प्रयत्न केला जाईल. 
एनएसएसमध्ये दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्ष धोरण जाहीर केले आहे. आम्ही भारताच्या एक वैश्विक शक्ती आणि भक्कम रणनीतिक व संरक्षण सहकारी म्हणून झालेल्या उदयाचे स्वागत करतो. आम्ही संरक्षण क्षेत्रातील अमेरिकेचा मोठा सहकारी असलेल्या भारताशी असलेले आपले संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवू. तसेच संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भारताच्या वाढत असलेल्या संबंधाना सहकार्य करू.  
"आम्ही भारतासोबत असलेली आपली सामरिक भागिदारी अधिक वाढवणार असून हिंदी महासागर आणि व्यापक क्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाचे समर्थन करू, असेही नव्या आर्थिक धोरणामध्ये अमेरिकेने म्हटले आहे. 
 दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा फटकार 
त्याबरोबरच एनएसएसची घोषणा करताना अमेरिकेने पाकिस्तानी भूमीवर सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्याचा इशाराही पाकिस्तानला दिला आहे. संसदेकडून मंजुरी मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी आपले पहिले राष्ट्रीय संरक्षण धोरण प्रसिद्ध केले आहे. या धोरणानुसार अमेरिकेला अस्थिरता न पसरवणारा पाकिस्तान आणि स्थित व स्वयंपूर्ण अफगाणिस्तान अपेक्षित आहे. 


Web Title: America's new defense policy says India's rising world power
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.