भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 12:10 PM2019-03-21T12:10:49+5:302019-03-21T12:11:27+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.

america another terror attack on india will be extremely problematic trumps latest warning to pakistan | भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा

भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा

Next

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांवर लवकरात लवकर गंभीर कारवाई करा, असंही अमेरिकेनं पाकला सांगितलं आहे. भारतावर आणखी एका दहशतवादी हल्ल्याचा तुम्ही विचार जरी केलात, तर तुमच्या प्रचंड अडचणी वाढतील, असे खडे बोल अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावले आहेत. व्हाइट हाऊसचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची गरज आहे.

पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबाविरोधात कारवाईची करण्याची आवश्यकता आहे. जर पाकिस्ताननं दहशतवादावर कारवाई केली नाही आणि भारतावर आणखी एक हल्ला झाल्यास पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊन पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकते.

भारतानं पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादी संघटनांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्ताननं काही कारवाई केली आहे. काही दहशतवाद्यांची संपत्ती जप्त केली आहे, तर काहींना अटक केली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या काही सुविधांवरही पाकिस्ताननं निर्बंध आणले आहेत. परंतु एवढ्यावरच न थांबता पाकिस्ताननं आणखी आक्रमक कारवाई करावी, असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. 

Web Title: america another terror attack on india will be extremely problematic trumps latest warning to pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.