भयंकर! कांगो नदीत ७०० प्रवाशांना नेणारे जहाज उलटले; ३०० जणांना वाचवले, १०० बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 03:11 PM2021-02-16T15:11:39+5:302021-02-16T15:14:01+5:30

आफ्रिकेतील कांगो देशात मोठी घटना घडली आहे. येथील कांगो नदीत (congo river) सुमारे ७०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ माजल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ७०० प्रवाशांपैकी ३०० जणांना वाचवण्यात यश आले असून, १०० जण बेपत्ता आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समजते.

60 people died and most of missing after overloaded boat sink in congo river | भयंकर! कांगो नदीत ७०० प्रवाशांना नेणारे जहाज उलटले; ३०० जणांना वाचवले, १०० बेपत्ता

भयंकर! कांगो नदीत ७०० प्रवाशांना नेणारे जहाज उलटले; ३०० जणांना वाचवले, १०० बेपत्ता

Next
ठळक मुद्देकांगो नदीत जहाज उलटले७०० प्रवाशांपैकी ३०० जणांना वाचवण्यात यश६० जणांचा मृत्यू, तर १०० जण बेपत्ता

किनहासा : आफ्रिकेतील कांगो देशात मोठी घटना घडली आहे. येथील कांगो नदीत (congo river) सुमारे ७०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ माजल्याचे सांगितले जात आहे. सुमारे ७०० प्रवाशांपैकी ३०० जणांना वाचवण्यात यश आले असून, १०० जण बेपत्ता आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे समजते. (60 people died and most of missing after overloaded boat sink in congo river) 

माई-नोमडबे प्रांतातमध्ये ही घटना घडली. ते जहाज किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाले होते. माय-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोटी गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. देशाचे मंत्री स्टीव मबिकायी यांनी या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. 

धक्कादायक! वुहानमध्ये ५०० टक्क्यांहून जास्त विध्वंस, १३ प्रकारचे कोरोना: WHO

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी

स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे जहाज उलटले. जहाजातून ७०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी ३०० जणांना वाचवण्यात यश आले असून, ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०० जण बेपत्ता आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मबिकायी यांनी या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे. कांगो नदीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. कांगो देशातील रस्त्यांची स्थिती खराब असल्यान लोक कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य देतात. जहाजातून अधिक लोक प्रवास करत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडतात, असे सांगितले जात आहे. 

Read in English

Web Title: 60 people died and most of missing after overloaded boat sink in congo river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.