अबब.. साठीचे आजोबा होणार 37 व्या मुलाचे बाबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 06:12 PM2017-10-31T18:12:58+5:302017-10-31T18:17:17+5:30

सध्या घडीला पती-पत्नी कुटुंब नियोजन करताना एक अथवा दोन मुलांचा विचार करतात. पण असा एक ग्रहस्त आहे तो 37 व्या मुलाचा बाबा होणार आहे.

.. 37 grandchildren grandfather for grandfather | अबब.. साठीचे आजोबा होणार 37 व्या मुलाचे बाबा

अबब.. साठीचे आजोबा होणार 37 व्या मुलाचे बाबा

Next

कराची - सध्या घडीला पती-पत्नी कुटुंब नियोजन करताना एक अथवा दोन मुलांचा विचार करतात. पण असा एक ग्रहस्त आहे तो 37 व्या मुलाचा बाबा होणार आहे..धक्का बसला ना? पण हे खरं आहे. हा व्यक्ती पाकिस्तानातील असून त्याचं नाव गुलजार खान आहे.  गेल्या वर्षी त्यानं स्थानिक वृत्तमानपत्र डॉनला दिलेल्या मुलाखतीत 100 मुलांचा पिता होण्याचा मानस असल्याचं बोलुन दाखवलं होतं. सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे.

गुलजार खान यांना 36 मुलं असूनही वंशविस्तार अजूनही थांबलेला नाही. त्यांचे वय साठच्या आसपास आहे. गुलजार खान यांनी तीन लग्नं केली आहेत. या तीन पत्नींपासून गुलजार यांना आतापर्यंत ३६ मुलं झाली असून लवकरच त्यांची पत्नी आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. गुलजार खान यांची पत्नी, मुले आणि नातवंडे असा मिळून 150 जणांचा परिवार आहे. इस्लामाबादमध्ये राहणाऱ्या गुलजार खान यांना या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो.

आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा भाऊ मस्तान यांनाही तीन पत्नी असून एकूण २२ मुले आहेत. याबाबत मस्तान यांना विचारले असता ते म्हणतात, माझा अल्लाहवर पूर्ण विश्वास आहे. तो जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला अन्न देईल, अशी माझी श्रद्धा आहे. कुटुंबाचा पसारा वाढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची त्यांना अजिबात चिंता नाही. पाकिस्तान लोकसंख्येच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकांचा देश आहे.

माझ्या मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी मित्रमंडळींची आवश्यकता भासणार नाही, असेही गुलजार सांगतात. ते म्हणतात, ईश्वराने मनुष्याची निर्मिती केली आहे. त्यांचा जन्म ही नैसर्गिक प्रक्रिया असताना ती रोखणारे आपण कोण?, असा सवाल ते विचारतात.
 

Web Title: .. 37 grandchildren grandfather for grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.