पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 03:01 PM2018-03-31T15:01:45+5:302018-03-31T15:01:45+5:30

गोळीबारामध्ये निषेध नोंदवणाऱ्या आंदोलकांपैकी १४०० लोक जखमी झाले आहेत.

17 Palestinian people die near Gaza borders | पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू

पॅलेस्टाइनच्या १७ नागरिकांचा गाझा बॉर्डरजवळ मृत्यू

googlenewsNext

जेरुसलेम- ४२ व्या ''लँड डे'' च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चावेळी इस्रायली दलांकडून झालेल्या गोळीबारात १७ पॅलेस्टाइन नागरिकांचे प्राण गेले आहेत. शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर पॅलेस्टाउनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यामुळे एक दिवस पॅलेस्टाइनमधील सर्व सरकारी कार्यालये, शाळा, विद्यापीठे बंद राहाणार आहेत. इस्रायली दलांनी केलेल्या गोळीबारामध्ये निषेध नोंदवणाऱ्या आंदोलकांपैकी १४०० लोक जखमी झाले आहेत.

३० मार्च १९७६ साली ६ पॅलेस्टाइन नागरिक इस्रायलच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्यांच्या स्मृतीसाठी या दिवशी लँड डे आयोजित केला जातो.  संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटर्स यांनी या प्रकरणाचा स्वतंत्र आणि पारदर्शक तपास झाला पाहिजे असं स्पष्ट केलं आहे. कुवैतचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मन्सूर अल ओतायबी यांनी इस्रायलविरोधात कारवाई करण्यात संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले आहे. पॅलेस्टाइनच्या आंदोलकांना ठार मारणाऱ्या इस्रायलविरोधात जॉर्डन सरकारनेही निषेध व्यक्त केला आहे. जॉर्डन सरकारचे प्रवक्ते मोहम्मद अल मोमानी म्हणाले, पॅलेस्टाइनमध्ये आज जे जाले त्याची जबाबदारी इस्रायलवर आहे. शांततामय मार्गाने निषेध नोंदविण्याचा अधिकार पॅलेस्टाइन नागरिकांना आहे. इस्रायलने या लोकांच्या विरोधात बळाचा वापर करणे म्हणजे त्यांच्या अधिकारांवर आक्रमण केल्यासारखे आहे. तुर्कस्थान आणि कतार सरकारनेही इस्रायलचा निषेध केला आहे.

Web Title: 17 Palestinian people die near Gaza borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.