विश्व हॉकी लीग : भारताचे लक्ष्य अंतिम फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 02:50 AM2017-12-08T02:50:53+5:302017-12-08T02:51:19+5:30

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

World Hockey League: India's goal final round | विश्व हॉकी लीग : भारताचे लक्ष्य अंतिम फेरी

विश्व हॉकी लीग : भारताचे लक्ष्य अंतिम फेरी

Next

भुवनेश्वर : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
भारताची उपांत्य फेरीत गाठ पडेल ती अर्जेंटिनाशी. अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व सामन्यात गुरुवारी इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला.भारताने सराव सामन्यात अर्जेंटिनाला नमविले होते. त्याचा लाभ भारताला मिळणार आहे. तथापि खराब फॉर्मशी झुंज देत असलेला अर्जेंटिना संघ मुसंडी मारण्यात पटाईत आहे, हे डोक्यात ठेवूनच भारत पाहुण्या संघाला सहज लेखण्याची चूक करणार नाही.
कलिंगा स्टेडियमवर दहा हजारांवर चाहत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मिळविलेला थरारक विजय अविस्मरणीय असाच होता. अचूक पेनल्टी कॉर्नर, वेगवान आक्रमण, यशस्वी बचाव आणि या सर्वांमध्ये विजयाची भूक भारतीय संघाकडे होती. प्रेक्षकांच्या पाठिंब्याचादेखील विजयात मोठा वाटा होता.
गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाला रोखून दमदार सुरुवात करणाºया भारताला पुढील दोन्ही सामन्यांत इंग्लंड आणि जर्मनीविरुद्ध अपयश आले. यामुळे मागचे कांस्य, तरी कायम राहील का, अशी शंका येऊ लागली होती; पण उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या बेल्जियमला धूळ चारताच सुवर्णपदकाची आस लागली आहे. साखळीत तिन्ही सामने जिंकणाºया बेल्जियमविरुद्ध भारतीय संघाने पहिल्या मिनिटापासून आक्रमक हॉकीचे दर्शन घडविले. सामना शूटआऊटपर्यंत गेला, पण गोलकिपर आकाश चिकटेने संघाला बळ दिले. नंतर हरमनप्रीतने मोक्याच्या क्षणी गोल करीत भारताला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करून दिला.
संघाच्या कामगिरीवर समाधानी कोच शोर्ड मारिन म्हणाले, ‘सामन्यागणिक खेळाडूंची कामगिरी सुधारत असल्याने भारतीय हॉकीचा दर्जा उंचावताना दिसत आहे. हा युवा संघ आहे. चुकाही झाल्या, पण दडपणात चांगली कामगिरी करीत अपेक्षा उंचावल्या आहेत.

जर्मनीकडून माजी विजेत्या नेदरलँडला पराभवाचा धक्का
सुरुवातीपासून अटीतटीच्या झालेल्या लढतीत जर्मनीने माजी विजेत्या नेदरलँडचा शूटआउटमध्ये ४-३ गोलने पराभव करून अंतिम ४ मध्ये आपली जागा निश्चित केली. जर्मनीला उपांत्य फेरीत रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागेल. जर्मनीकडून जूलियस मेयेर्स १२व्या, स्टेब कोंस्टेंटिनने ४१व्या तर फ्लोरियन फुचने ३४व्या मिनिटाला गोल केला. नेदरलँडकडून मिर्काे प्रूजरने २१ व ६० व्या तर ब्योर्न केलेरमैनने २७ व्या मिनिटाला गोल केला. ३-३ बरोबरी असताना जर्मनीकडून क्रिस्टोफर रूरने निर्णायक गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

पदकाचा रंग बदलायचा आहे...
गेल्या तिन्ही सामन्यांत पेनल्टी कॉर्नरवर अनेक चुका झाल्या. आम्ही यावर काम केले. उपांत्य सामन्यात चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणार आहोत. मागच्या वेळी उपांत्य सामना गमावला. यंदा असे होणार नाही. पदकाचा रंग बदलायचा आहे.
- मनप्रीतसिंग,
कर्णधार, भारत

मोठ्या संघांना नमवण्याची क्षमता आमच्या आधीपासूनच होती, पण कधी स्वत:ला सिद्ध करू शकलो नव्हतो. उपांत्यपूृर्व फेरीत आम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या किती मजबूत आहोत हे सिद्ध केले. विशेष म्हणजे प्रशिक्षकांनी आम्हाला राष्ट्रीय सॉकर लीगचे प्रेरणादायी व्हिडीओ दाखवले. फ्रॅक्चरमधून सावरून दमदार पुनरागमन केलेल्या अँकी जॉन्सन याचे प्रेरणादायी अनुभव ऐकून आमचा आत्मविश्वास उंचावला. जर आम्ही ही स्पर्धा जिंकली, तर आगामी मोठ्या स्पर्धेसाठी मोठा आधारस्तंभ तयार होईल.
- एस. व्ही. सुनील, स्ट्रायकर

भारतीय संघाने उपांत्यपूर्व सामन्यात एक विशेष स्तर गाठला जी चांगली गोष्ट आहे. याहून चांगले म्हणजे या संघाला हा स्तर कसा गाठला पाहिजे, ते चांगले ठावूक आहे. एकूणंच संघातील सर्वच खेळाडू चांगले खेळत आहेत. जर उपांत्यपूर्व फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरले, तर हा संघ कोणालाही पराभूत करु शकतो. आमचा संघ युवा आहे. पण या संघातील अनेख खेळाडू युवा विश्वचषक विजेत्या संघातील असून त्यांनी युरोप दौºयातही चांगली कामगिरी केली आहे.
- शोर्ड मारिन, भारतीय संघ प्रशिक्षक

Web Title: World Hockey League: India's goal final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.