मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदार... असरदार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:29 PM2018-09-15T23:29:10+5:302018-09-15T23:29:33+5:30

१२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शांत चित्ताने खेळलेल्या हॉकीपटूची निवृत्ती

Middle pillar headgear ... effective | मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदार... असरदार

मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदार... असरदार

नवी दिल्ली : १२ वर्षांआधी तो कुठलाही गाजावाजा न करता भारतीय संघात दाखल झाला. मधल्या फळीचा आधारस्तंभ ते संघाचा कर्णधार, अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारतीय हॉकीचा स्टार, विश्व दर्जाचा दमदार मिडफिल्डर, पद्मश्री पुरस्कारप्राप्त दिग्गज खेळाडू अशा अनेक भूषणावह गोष्टी अनुभवणारा ३२ वर्षांचा सरदारसिंग संघातील सर्वाधिक फिट खेळाडू. पण, अचानक निवृत्ती जाहीर करणाºया या स्टारची खेळातील ‘एक्झिट’ही शांत-शांत ठरली.
सरदारचे स्वप्न टोकियो आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे हे होते; पण नियतीला ते मान्य नसावे. आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाच्या खराब कामगिरीनंतर या खेळाडूने हॉकीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अनेक जाणकारांना असेही वाटते, की आशियाडमधील खराब कामगिरीसाठी सरदारला हेतुपुरस्सर ‘बळीचा बकरा’ बनविण्यात आले. त्याला निवृत्ती पत्करण्यास बाध्य करण्यात आले. पण, सरदारने स्वत: केलेले भाष्य विचारात घेण्यासारखे आहे. तो म्हणतो, ‘उपांत्य सामन्यात मलेशियाकडून झालेला पराभव निवृत्तीचा विचार करण्यास भाग पाडणारा ठरला.’
तो पुढे म्हणाला, ‘‘मी खेळणे सुरू ठेवू शकलो असतो. आणखी काही वर्षे खेळू शकतो, असे मला स्वत:ला वाटते. पण, मलेशियाकडून झालेला पराभव सारखा विचलित करीत आहे. हा पराभव पचनी पडत नाही. पराभवानंतर अनेक दिवस मी झोपलोदेखील नाही. वारंवार विचार केल्यानंतरच मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.’’
सरदार हॉकी मैदानावर मुरब्बी खेळाडूसारखाच वावरला. यादरम्यान त्याने अनेकदा जेतेपदही मिळवून दिले. त्याच्या उपस्थितीत भारतीय संघाने २०१४च्या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण जिंकलेच; शिवाय २०१० आणि २०१८च्या स्पर्धेत कांस्यचा मानकरी ठरला. दोनदा राष्टÑकुलचे रौप्यविजेत्या संघात सरदारचा समावेश होता. यंदा ब्रेडा येथे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला उपविजेतेपद मिळाले. याशिवाय सरदारच्या उपस्थितीत संघाने आशिया कप दोनदा जिंकला हे विशेष.
सरदारकडे २००८मध्ये नेतृत्व सोपविण्यात आले. आठ वर्षे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर २०१६मध्ये नेतृत्वाची जबाबदारी त्याने गोलकीपर पी. आर. श्रीजेशकडे सोपविली. सर्वांत कमी वयात कर्णधार बनलेल्या सरदारने ३५० हून अधिक आंतरराष्टÑीय सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले. फिटनेसमध्ये त्याला पर्याय नव्हता.

सचिन तेंडुलकरने प्रेरणा दिली
नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात जागा न मिळाल्याने आपण निराश झालो होतो. यावेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्याला प्रेरणा दिली, अशी माहिती हॉकीपटू सरदार सिंग याने दिली. सरदारने बुधवारी आंतरराष्टÑीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सरदार म्हणाला, ‘सचिनपाजी माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. मागील तीन-चार वर्षांपासून त्यांनी मला खूप मदत केली आहे.’

Web Title: Middle pillar headgear ... effective

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.