भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:23 AM2018-08-08T04:23:40+5:302018-08-08T04:23:49+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले.

Indian hockey team's place improved | भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले

भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले

googlenewsNext

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले. महिला संघानेही एका स्थानाने सुधारणा करत नववे स्थान गाठले आहे.
भारतीय पुरुष संघाला गेल्या महिन्यात नेदरलँडमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत निर्धारित वेळेत १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर शूटआऊटमध्ये भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या संघांमध्ये केवळ भारतीय संघच आपल्या मानांकनामध्ये सुधारणा करण्यात यशस्वी ठरला. भारताच्या खात्यावर आता १४८४ गुण आहेत. २०१२ चा आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनी, इंग्लंड व स्पेन या संघांच्या तुलनेत भारताचे मानांकन गुण अधिक आहेत.
विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया १९०६ मानांकन गुणांसह अव्वल स्थानी आहे. आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना (१८८३) दुसऱ्या, बेल्जियम (१७०९) तिसºया आणि नेदरलँड (१६५४) भारताच्या तुलनेत वरच्या स्थानी आहेत. अव्वल १० मध्ये जर्मनी, इंग्लंड, स्पेन, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांचाही समावेश आहे.
भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. मलेशिया १२ व्या स्थानासह आशियातील दुसरा सर्वोत्तम संघ आहे. त्यानंतर पाकिस्तान व कोरिया या संघांचा क्रमांक
लागतो. (वृत्तसंस्था)
लंडनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाºया भारतीय महिला संघाने एका स्थानाची प्रगती करत नववे स्थान पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडविरुद्ध पराभूत झालेला भारत स्पर्धेपूर्वी दहाव्या स्थानी होता. आता ११३८ मानांकन गुणांसह नवव्या स्थानी आहे. विश्वकप विजेता नेदरलँड अव्वल स्थानी कायम असून इंग्लंड दुसºया स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाने दोन स्थानांनी प्रगती करत तिसरे स्थान पटकावले. अर्जेंटिनाची एका स्थानाने घसरण झाली असून हा संघ चौथ्या स्थानी आहे.

Web Title: Indian hockey team's place improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी