Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:49 PM2018-12-06T18:49:34+5:302018-12-06T18:50:26+5:30

Hockey World Cup 2018: न्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला.

Hockey World Cup 2018: New Zealand snatched Spain's victory in the last 10 minutes | Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

Hockey World Cup 2018: न्यूझीलंडने शेवटच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला

Next
ठळक मुद्देन्यूझीलंडने अखेरच्या दहा मिनिटांत स्पेनचा विजय हिरावलाशेवटच्या दहा मिनिटांत त्यांच्याकडून दोन गोलस्पेन-न्यूझीलंड सामना 2-2 असा बरोबरीत

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: न्यूझीलंड संघाने गुरुवारी खेळलेल्या 'A' गटाच्या लढतीत स्पेनचा विजयाचा घास हिसकावला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनी अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल करताना सामना 2-2 असा बरोबरी सोडवून गटात दुसरे स्थान कायम राखले. स्पेनला मात्र स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील सामन्याकडे लक्ष ठेवावे लागेल.  



'A' गटातून अर्जेंटिनाने दोन विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे त्यांना साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात फ्रान्सविरुद्ध औपचारिकता म्हणून खेळावे लागणार आहे. मात्र, फ्रान्सला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार आहे आणि तसे झाल्यास स्पेनचे आव्हान संपुष्टात येईल. स्पेनने तीन सामन्यांत एक पराभव आणि दोन अनिर्णीत निकालांसह दोन गुणांची कमाई केली आहे. त्यांचा गोलफरक हा -1 असा आहे.

फ्रान्सने दोन सामन्यांत एक पराजय व एक अनिर्णीत निकाल नोंदवला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 1 गुण आहे आणि त्यांचा गोलफरकही -1 असा आहे. या गटातून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या चढाओढीत न्यूझीलंडने 4 गुणांसह दुसरे स्थान निश्चित केले आहे. तिसऱ्या स्थानावर सध्या तरी स्पेनचा संघ असला तरी अर्जेंटिनाविरुद्धच्या निकालाने समिकरण बदलू शकते. 

Web Title: Hockey World Cup 2018: New Zealand snatched Spain's victory in the last 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.