Hockey World Cup 2018: India will face belgium in group C match | Hockey World Cup 2018 : भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी
Hockey World Cup 2018 : भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्याची संधी

ठळक मुद्देविश्वचषक स्पर्धेत भारत-बेल्जियम सामना आजविजय मिळवून थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची संधीभारतीय संघाला माजी खेळाडूंकडून शुभेच्छा

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत दणक्यात सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेवर 5-0 असा विजय मिळवला. मात्र, त्यांची खरी कसोटी आज जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमविरुद्ध लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यात भारताला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता येणार आहे. 
गेल्या ४३ वर्षांत पहिल्यांदा विश्वचषकात पदक विजयाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताने विश्वचषकात शानदार सुरुवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 5-0 ने धूळ चारली होती. रिओ ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता बेल्जियमने कॅनडाचा २-१ ने पराभव केला खरा, पण त्यांचा खेळ लौकिकाला साजेसा नव्हता. भारत आणि बेल्जियम गेल्या पाच वर्षांत 19 वेळा परस्परांविरुद्ध खेळले. त्यातील 13 सामने बेल्जियमने जिंकले, तर एक सामना अनिर्णीत राहिला. पण, विश्वचषक स्पर्धेत हे चित्र उलट आहे.


भारताने आफ्रिकेविरुद्ध आक्रमक खेळ केला आणि बेल्जियमविरुद्ध त्यांना हीच लय कायम राखावी लागेल.  सातत्याचा अभाव भारतीय हॉकीची मूळ समस्या आहे. बेल्जियमवर विजय नोंदविण्यासाठी प्रत्येक आघाडीवर सरस कामगिरी करावी लागणार आहे. आफ्रिकेविरुद्ध मनदीप सिंग, सिमरनजित सिंग, आकाशदीप आणि ललित उपाध्याय यांच्या आक्रमक फळीने चोख कामगिरी बजावली. मनप्रीतच्या नेतृत्वात मधल्या आणि बचावफळीने स्वत:ची जबाबदारी पार पाडली, तर गोलकीपर श्रीजेशने प्रभावी कामगिरीसह हल्ले शिताफीने परतवून लावले.


असे आहेत संघ,
भारत: मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलरक्षक), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिम्रनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलरक्षक),
बेल्जियम: ब्रिल्स थॉमस (कर्णधार), वॅन डोरेन आर्थर, डोहमेन जॉन-जॉन, वॅन युबेल फ्लोरेंट, बोकार्ड गॉथियर, स्टॉकब्रोक्स इम्मानुअल, डेनायर फेलीक्स, वॅनस्च विन्सेंट, लुपार्ट लॉइक, वेगनेझ विक्टर, बून टॉम, हेंड्रीक्स अलेक्झांडर, गॉगनार्ड सिमॉन, डोकियर सेबास्टीन, चार्लीयर सेड्रीक, डे कॅरपेल निकोलस, डे स्लूवर आर्थर
भारतीय संघाला माजी खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा


Web Title: Hockey World Cup 2018: India will face belgium in group C match
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.