बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 01:35 AM2018-12-12T01:35:16+5:302018-12-12T01:35:50+5:30

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले.

Belgium washed 5-0 by Pakistan | बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले

बेल्जियमने पाकिस्तानला ५-० ने धुतले

Next

भुवनेश्वर : ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या बेल्जियमने तुफानी खेळ करताना तिसऱ्या क्रॉसओव्हर सामन्यात पाकिस्तानला ५-० असे लोळवले. हा मानहानिकारक पराभवासह चारवेळच्या विश्वविजेत्या पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या एकतर्फी सामन्यात बेल्जियमला पाकिस्तानच्या बचावफळीने काहीवेळ रोखले. त्यामुळे पहिल्या दहा मिनिटांत पाकने नियंत्रण राखले. पण १०व्या मिनिटाला अलेक्झांडर हेंड्रिक्सने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत बेल्जियमला आघाडीवर नेले. येथून पिछाडीवर पडलेल्या पाकला त्यानंतर पुनरागमन करण्यात यश आले नाही. यानंतर हेंड्रिक्सशिवाय कर्णधार थॉमस ब्रायल्स (१३वे मिनिट), सेड्रिक चार्लिएर (२७वे मिनिट), सेबस्टियन डॉकेर (३५वे मिनिट) व टॉम बून (५३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत बेल्जियमचा विजय साकारला. बेल्जियम गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या तगड्या आव्हानाला सामोरे जाईल. बेल्जियमने संपूर्ण सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना पाकिस्तानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Belgium washed 5-0 by Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.