ट्रक-सिगारेट,१ कोटींचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:12 AM2019-01-11T00:12:04+5:302019-01-11T00:12:22+5:30

हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोडजवळ उत्तरप्रदेशचे दोन ट्रकमधून सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. सिगार व ट्रक असा मिळुन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

 Truck-cigarette, worth of 1 crore seized | ट्रक-सिगारेट,१ कोटींचा मुद्देमाल जप्त

ट्रक-सिगारेट,१ कोटींचा मुद्देमाल जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर पार्डी मोडजवळ उत्तरप्रदेशचे दोन ट्रकमधून सिगारेट घेवून जात असताना १० जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. सिगार व ट्रक असा मिळुन जवळपास १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
‘आरोग्यास धोकादायक’ असा मजकूर सिगारेटच्या पाकीटावर नव्हता. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. सविस्तर माहिती अशी की सिगारेट दोन ट्रकमध्ये जात असल्याची गुप्त माहिती गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली ही माहिती मिळताच फौजदार सुभान केंद्रे, गणेश राठोड, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, बालाजी बोके, प्रल्हाद थोरात यांनी यांनी नांदेडकडे जाणाऱ्या एच.आर- ५५ के. ९३९६ व एचआर - ५५ एम २७०३ हे ट्रक पकडून पोलीस ठाण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर एचआर ५५ के ९३९६ या ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये पॅरीस नावाचे सिगारेट आढळून आले. हे सिगारेट ५८ लाखाचे असल्याचे आढळून आले. या सिगारेटवर आरोग्यासाठी धोकादायक असे लिहिलेले नसल्यामुळे ते अवैध असल्याने हे सिगारेट जप्त करण्यात आली. दुसरा ट्रक एचआर ५५ एम २७०३ ११ जानेवारी तपासल्या जाणार असल्याचे फौजदार केंद्रे यांनी सांगितले. या दोन्ही ट्रकची तपासणी केल्यानंतर ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Truck-cigarette, worth of 1 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.