१५ जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:28 PM2018-07-12T23:28:39+5:302018-07-12T23:29:07+5:30

जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. २१६७ पात्र विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

 Teacher Eligibility Test on July 15th | १५ जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा

१५ जुलैला शिक्षक पात्रता परीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. २१६७ पात्र विद्यार्थी परीक्षेस बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे. १५ जुलै रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जवळपास ४०० कर्मचाºयांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्ह्यातील ७ केंद्रावरून १५ जुलै रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून यामध्ये सकाळ सत्रात सरजूदेवी आर्य कन्या विद्यालय २८८, माणिक स्मारक विद्यालय २६४, आदर्श महाविद्यालय ३३६, आदर्श महाविद्यालय ३२५ परीक्षार्थ्यांची संख्या आहे. तर दुपारसत्रात सिक्रेटहार्ट इंग्लिश स्कूल २९१, आदर्श महाविद्यालय अ ३३६, आदर्श महाविद्यालय ब ३२७ एकूण सात केंद्रावरून १ हजार १६७ परीक्षार्थी शिक्षक पात्रता परीक्षेस बसणार आहेत.
परीक्षेचे वेळापत्रक
४झोनल अधिकारी २, सहाय्यक परिक्षक ७, पर्यवेक्षक १८, समवेक्षक ९२, लिपिक १४ व २८ सेवक कार्यरत असणार आहेत. सकाळ सत्रात १०.३० ते दुपारी १ तर दुपार सत्रात २ ते ४.३० असे परीक्षेचे वेळापत्रक आहे.

 

Web Title:  Teacher Eligibility Test on July 15th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.