शिक्षक पुरस्कार गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:40 AM2018-10-24T00:40:31+5:302018-10-24T00:40:47+5:30

आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.

 Teacher award in the bouquet! | शिक्षक पुरस्कार गुलदस्त्यातच!

शिक्षक पुरस्कार गुलदस्त्यातच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने यापूर्वी दिली. त्यातही बदल करण्यात आला. परंतु पुढची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवड समितीची बैठक झाली असली तरी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे आता कोणत्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल, याचा मेळ नाही. शिवाय याबाबत शिक्षण विभागाकडे माहितीही उपलब्ध नाही. संबधित तालुक्याच्या गट-शिक्षणाधिकाºयांनी जिल्हा शिक्षण कार्यालयात १६ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव मंजूरीनंतर कार्यक्रमाची तारीख ठरणार असल्याचे शिक्षकांतून सांगण्यात आले. परंतु दरवर्षीच पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. याला संबधित शिक्षण यंत्रणा व जि. प. प्रशासन कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. वेळोवेळी कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने हा सोहळा कधी पार पडणार? याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षीच या सोहळ्याचे नियोजन बारगळते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन केले जात नाही. त्यात बैठकही लवकर होत नाही. परिणामी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो, यावर्षीही गतवर्षीचे चित्र आहे.

Web Title:  Teacher award in the bouquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.