महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:17 AM2018-02-22T01:17:22+5:302018-02-22T01:17:28+5:30

येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 Respect for Farmers with Women Savings Groups | महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा.राजीव सातव, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, प्र.जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, सीईओ एच.पी.तुम्मोड, शिक्षण सभापती संजय देशमुख, संजय बोंढारे, सतीश पाचपुते, विठ्ठल चौतमल, भानुदास जाधव, रत्नमाला चव्हाण, संजय राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या महिला बचत गटांचा अनुक्रमे ५, ३, २ हजारांचा पुरस्कार, सन्मानचिन सत्कार करण्यात आला. हिंगोलीत अण्णा भाऊ साठे बचत गट समगा-प्रथम, राजमाता बचत गट देवठाणा-द्वितीय, सावित्रीबाई बचत गट देवठाणा-तृतीय, कळमनुरीत दुधाधारी बचत गट बिबगव्हाण-प्रथम, महिला स्वयंसहायता समुह शेनोडी-द्वितीय, अहिल्यादेवी बचत गट हातमाली-तृतीय, वसमत तालुक्यात जनकल्याण बचत गट इंजनगाव प्रथम, जिजामाता बचत गट पांगरा शिंदे द्वितीय, संतो रोहिदास बचत गट बोराळा तृतीय, औंढा तालुक्यातून यशोधरा बचत गट प्रथम, जागृती बचत गट-द्वितीय, सावित्रीबाई फुले बचत गट लाख तृतीय, सेनगाव तालुक्यातून लक्ष्मी वैभव बचत गट गोरेगाव प्रथम, गोरोबाकाका बचत गट साखरा द्वितीय, डॉ.बाबासाहेब बचत गट पळशी तृतीय यांना पुरस्कार प्रदान केले. तर यातूनच जिल्हास्तरीय तीन बचत गटांना पुरस्कार प्रदान केला.
विविध पिकांचे चांगले उत्पादन घेणाºया कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील अशोक पतंगे, जवळा पांचाळचे डॉ. नारायण उधाने, नवख्याचे ज्ञानेश्वर देशमुख, टाकळगव्हाणचे पंडित श्रृंगारे, जांबचे रामजी तोरकड, चाफनाथ शे. शब्बीर शे. ताहेर, वारंगा त.ना. वामन गिराम, कसबे धावंडा पंकज पतंगे, वारंगा फाटा तातेराव कदम, डोंगरकडा अभिनव क्लब, डोंगरकडा आनंदराव पतंगे, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संतोष शिंदे, सापडगाव गजानन अवचार, सेनगाव नारायणराव देशमुख, सावरखेडा भागवत मुंढे, जवळा बु. अनंथा इंगोले, वाघजाळी बालाजी तांबिले, वाघजाळी रामेश्वर तांबिले, बाभुळगाव ज्ञानेश्वर ठेंगडे, वलाना गजानन हेंबाडे, वडहिवरा अरविंत पोले, औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव बाबाराव राखोडे, शिरडशहापूर रेणुकादास देशपांडे, आसोला प्रभाकर नागरे, सिद्धेश्वर वनमालाताई खंदारे, जलालपूर शांताबाई उदास, सुरवाडी मचंक टोपे, चिंचोली नी. वसंत मोरे, धारखेडा रामप्रसाद कºहाळे, औंढा नागनाथ गजानन पाटील, जलालदाभा बाळासाहेब चव्हाण, वसमत तालुक्यातील गिरगाव अशोक कºहाळे, पांग्रा शिंदे शिवाजीराव शिंदे, पांग्रा शिंदे सोपानराव शिंदे, भेंडेगाव नागेश सोनटक्के, पिंपराळा साहेबराव कदम, महमदपुरवाडी हरिदास जटाळे, वसमत संजय शिंदे, तेलगाव बालासाहेब राऊत, हट्टा वसंतराव देशमुख, सातेफळ कावेरी प्रल्हाद बोरगड, हिंगोली तालुक्यातील देवठाणा शिवाजी आगलावे, वैजापूर विजय डांगे, कनका शंतनू भानुदास, पिंपळखुटा विठ्ठल ढेंगळे, खरबी भानुदास शितोळे, सवड गणेश थोरात, इंचा तुकाराम लिंबाळे, कनका संतोष काटकर, भिंगी तुकाराम आगलावे, वांझोळा रामेश्वर गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title:  Respect for Farmers with Women Savings Groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.