तलाब कट्टा भागातील नागरिकांना मिळणार पर्यायी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:46 PM2018-12-08T23:46:39+5:302018-12-08T23:46:52+5:30

जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेत पक्क्या घरकुलाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

 Optional seats for people in Talab Katta area | तलाब कट्टा भागातील नागरिकांना मिळणार पर्यायी जागा

तलाब कट्टा भागातील नागरिकांना मिळणार पर्यायी जागा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जलेश्वर तलाब परिसरातील तलाब कट्टा भागात १९५ अतिक्रमीत घरांना हटविण्याचे आदेश तहसीलदारांनी बजावल्यानंतर या नागरिकांनी पालिका गाठत आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याकडे गा-हाणे मांडले. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत म्हाडाच्या जागेत पक्क्या घरकुलाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
नगर पालिकेच्या सभागृहात तलाब कट्टा या भागातील नागरिकांनी आपल्याला तहसीलदारांनी अतिक्रमण उठवण्याचा दिलेल्या नोटिसा घेवून आलेल्यांनी पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांना साकडे घातले. यावेळी नागरिकांची बाजू समजून घेत या प्रकरणी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. बेघर होणाऱ्या कुटूंबियांना म्हाडाच्या जागेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, शासनाकडून तात्पुरती व्यवस्था म्हणून त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक गणेश बांगर, आमेरअली, सुनील भुक्तर, मनोज शर्मा, सचिन जायभाये, रतन काळे, जयवंत काळे, फुलाजी शिंदे, सचिन शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title:  Optional seats for people in Talab Katta area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.