न.प.त वाढली नियोजनशून्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:16 AM2018-04-14T00:16:06+5:302018-04-14T00:16:06+5:30

वीजबिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे न.प.च्या सभागृहाने फेटाळल्यानंतरही रस्ता व डिव्हायडरच्या कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. न.प.च्या या नियोजनशून्य कारभाराला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे शहरप्रमुख अशोक नाईक यांनी सांगितले.

 NPP increased appraisal | न.प.त वाढली नियोजनशून्यता

न.प.त वाढली नियोजनशून्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वीजबिल भरायला नगरपालिकेकडे पैसे नाहीत. तर दुसरीकडे न.प.च्या सभागृहाने फेटाळल्यानंतरही रस्ता व डिव्हायडरच्या कामांच्या निविदा काढल्या जात आहेत. न.प.च्या या नियोजनशून्य कारभाराला विरोध करण्यासाठी प्रसंगी शिवसेना रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे शहरप्रमुख अशोक नाईक यांनी सांगितले.
१४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुका निघतात. यात अबालवृद्ध सहभागी होतात. मात्र अंधारलेल्या रस्त्यांवर काही अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार राहील. २00५ ते २0१६ पर्यंत याच न.प.ने नियमित देयक भरले होते. मग मागील दोन वर्षांतच असे काय झाले की, वीज खंडित केली जात आहे. एवढी थकबाकी कशी वाढली? सभागृहाला या प्रश्नावर का विश्वासात घेतले जात नाही? तर ही थकबाकी न भरता भलतीच विकास कामे केली जात आहेत.
जि.प. शाळा ते बिरसा मुंडा चौक हा रस्ता अवाजवी इस्टिमेट करून केला जात आहे. याला विरोध करून सभागृहाने ठराव फेटाळला होता. तरीही निविदा निघाली. तसेच अग्रसेन चौक ते आंबेडकर पुतळा रस्त्याचा अर्धा भाग तर सा.बां.च्या हद्दीत आहे. तर या रस्त्यावर चांगले डिव्हायडर आहे. तरीही नव्या कामाचा आग्रह का? भूमिगत गटार योजनेमुळे खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याऐवजी ही कामे करण्यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल केला. एवढेच नव्हे, तर झाडे लावण्याची निविदाही अशीच अट्टाहासाने मंजूर केली. मात्र अनेक झाडे रस्त्यातच लावली. हे पाहणे कुणाचे काम? असा सवालही नाईक यांनी केला. ‘अंधेरनगरी चौपट राजा’ अशा मानसिकतेतून नगरपालिकेने बाहेर येणे गरजेचे आहे. तर रस्ते विकासासाठी आगामी काळात निधी मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने योग्य नियोजन न केल्यास इतरही नगरसेवकांना सोबत घेवून सेना लढा देईल, असे नाईक म्हणाले.
यामुळे न.प.त पुन्हा संघर्ष वाढण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत.

Web Title:  NPP increased appraisal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.