Malwad collapses and injures five | माळवद कोसळून पाच जण जखमी
माळवद कोसळून पाच जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथे जुने माळवद कोसळून पाच जण गंभीर झाल्याची घटना ११ आॅक्टोबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास घडली.
नांदापूर येथील जनार्धन भीमराव कल्याणकर यांच्या माळवदाच्या घरात सर्वच मंडळी झोपली होती. अचानक रात्री माळवद कोसळल्यामुळे गौरी जनार्धन कल्याणकर ही मुलगी ढिगाऱ्याखाली दबली होती. त्यामुळे जखमी झाली आहे. यामध्ये गोपाल जनार्धन कल्याणकर, मंगल जनार्धन कल्याणकर, जनार्धन भीमराव कल्याणकर हे चौघेजण जखमी झाले आहेत. बाळासाहेब सुभाषराव हे यांना काढताना जखमी झाले.
रात्री माळवद कोसळल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. संपूर्ण परिवार झोपेत असताना ही दुर्घटना घडली आहे. दोन दिवसांपासून वीज नसल्याने ही रात्री अचानक दुर्घटना घडली आहे.


Web Title:  Malwad collapses and injures five
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.