जीपच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:56 AM2018-04-16T00:56:09+5:302018-04-16T00:56:09+5:30

हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर माळेगाव फाट्याजवळ जीपच्या धडकेने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली.

 A jeep in the jeep | जीपच्या धडकेत एक ठार

जीपच्या धडकेत एक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर माळेगाव फाट्याजवळ जीपच्या धडकेने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली.
रोशन मन्नीलाल आहेके (२५ रा. खापा (मध्यप्रदेश) हे पार्डीमोड जवळ बीएसएनएलचे केबल टाकण्याचे काम करतात. १५ एप्रिल रोजी सकाळी पार्डीमोडहून माळेगाव येथे भाजीपाला आणण्यासाठी ते मोटारसायकल क्र. एमएच २७ एएक्स ७६४९ ने जात होते. मालेगावहून येणाऱ्या जीप क्र. एमएच २६ एन- २७९९ ने मोटार सायकलला माळेगाव जवळ घोळवा वळणावर समोरासमोर धडक दिली. यात मोटारसायकलस्वार रोशन आहके हे जागीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोनि जी.एस. राहिरे, फौजदार पठाण, जनार्दन फुपाटे, बालाजी जोगदंड, शामराव गुहाडे, सोपान थिटे, शेख मुजीब यांनी घटनास्थळी जाऊन मयत ग्रामीण रुग्णालयात आणले. जीप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title:  A jeep in the jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.