वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:57 AM2018-11-11T00:57:34+5:302018-11-11T00:57:51+5:30

वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते.

 Jeep fell on Vasat-Parbhani road; 11 injured | वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी

वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते.
वसमत- परभणी प्रवासी घेवून निघालेली जीप रांजोना पाटीजवळ उलटली. जीपमध्ये कोंबून प्रवासी बसविण्यात आले होते. या अपघातात पवन शिंदे (रा.परभणी), जर्नाधर काळे, पुरभाजी चेरंगे, चंद्रशेखर शिंदे, सटवाजी चेरंगे, संगीता चेरंगे (चिखली), पांडुरंग कदम, वंदना कदम (जवळा खंदारबन), शेख मोसीन (वसमत), दत्ता सावंत, जयश्री सावंत (बोरी सावंत), सोनाली खुळखुळे (चिखली) हे प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्तांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना नांदेडला रेफर केले जाणार होते. याबाबतचा अधिक तपशिल मिळू शकला नाही.

Web Title:  Jeep fell on Vasat-Parbhani road; 11 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.