गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:24 AM2018-04-04T00:24:17+5:302018-04-04T00:24:17+5:30

येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 Goregaon encroachment campaign; Counting started | गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू

गोरेगावात अतिक्रमण हटाव मोहीम; मोजणी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकांमार्फत २ एप्रिलपासून अतिक्रमण धारकांची यादी व जागा मोजमाप सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेमुळे सामान्य गोरगरीब कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोरेगाव येथील सर्वे नं. १४०, १८८, १९४, १९७, १९८, २११, २५६, ३८९, १४० असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासकीय हालचालींना सुरूवात झाली आहे. शासकीय जमिनीवर असलेल्या अतिक्रमणाबाबत अतिक्रमण धारकांचे नावे अतिक्रमण केल्याचे वर्ष, अतिक्रमित क्षेत्र, अतिक्रमित घरातील सदस्य संख्या, अतिक्रमित जागेवरील बांधकामांची स्थिती याबाबतची माहिती तपशील बनविण्यासाठी तहसीलदार वैशाली पाटील यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी ग्रामसेवक, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल या एकूण ४३ कर्मचाऱ्यांची सहा पथके नेमण्यात आली असून पथकांना सर्वे नं. नेमून दिली आहेत. आदेशानुसार २ एप्रिल रोजी गोरेगाव येथील गांधीनगर भागातून विहित नमुन्यात माहिती जमा करण्याच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. ही माहिती १६ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आदेश आहेत. गत वर्षी तहसीलदार वैशाली पाटील यांनी गोरेगाव ग्रापंचायत कार्यालयास दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेटी देत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कारवाईच्या सूचना दिल्या. प्रसंगी अतिक्रमण धारकांना चांगलीच धास्ती बसली होती. ४० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या या लोकांवर बेघर होण्याची वेळ येऊ नये, म्हणून डॉ. रवी पाटील यांनी यापूर्वी निवेदनही दिले होते.

Web Title:  Goregaon encroachment campaign; Counting started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.