हिंगोलीतील कयाधू नदीला पूर; पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:13 PM2018-08-21T12:13:49+5:302018-08-21T12:17:38+5:30

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Floods in Kayadhu river in Hingoli; Crop damage due to water entering the field | हिंगोलीतील कयाधू नदीला पूर; पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान 

हिंगोलीतील कयाधू नदीला पूर; पाणी शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान 

Next

हिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. कालपासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 60  मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कयाधू नदीलापूर आला असून 12 ते 13 गावांच्या शेतशिवारात पाणी घुसल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय झालेले पर्जन्यमान असे हिंगोली 66.88 कळमनुरी 66 सेनगाव 41.67 वसमत 51.21 तर औंढा तालुक्यात 84 मी मी पाऊस झाला आहे. यामुळे पैनगंगा व कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे. कयाधूचे पाणी काही भागात शेतशिवारात शिरले असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. 12 ते 13 गावांमध्ये असा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांना ही पूर आला असून यामुळे नेहमीच संपर्क तुटणाऱ्या दहा ते बारा गावांना फटका बसला आहे.

बाळापुर हदगाव रस्ता बंद
कयाधू नदीला पूर आल्याने शेवाळानजीक बाळापुर-हदगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तसेच अनेक शेतांमध्ये शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Web Title: Floods in Kayadhu river in Hingoli; Crop damage due to water entering the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.