शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:19 AM2019-03-10T00:19:15+5:302019-03-10T00:20:23+5:30

राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून २५ मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.

Circular was changed in the district of teachers | शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले

शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे परिपत्रक काढले

Next
ठळक मुद्देग्रामविकास विभागाने काढले परिपत्रकशिक्षकांचे चार संवर्ग पाडले

कळमनुरी : राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून २५ मार्च पासून शिक्षकांचीबदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातंर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने ८ मार्च रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार बदलीपात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक निव्वळ रिक्त जागा अनिवार्य रिक्त जागा यांच्या याद्या १९ मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्याचेही परिपत्रकात नमुद आहे. जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत ८ मार्च रोजी ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स.ना. भंडारकर यांनी परिपत्रक काढले आहे. बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकाची बदलीस निश्चित धरावयाची सेवा १० वर्षे पुर्ण झाली आहे. आणि कार्यरत शाळेत सदर शिक्षकाची सेवा किमान ३ वर्ष पूर्ण झाली आहे. असे शिक्षक बदलीस पात्र राहणार आहेत. शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या सुधारीत बदलीधोरणानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहे. राज्यातील ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा कोकण विभागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या मार्चमध्ये पुर्ण केल्या आहेत. आता उर्वरीत ३० जिल्ह्यातील जि.प. शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहे. सर्व साधारण क्षेत्र व अवघड क्षेत्र हे दोन क्षेत्रानुसार बदल्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी सुधारीत धोरणही ८ मार्चच्या शुद्धीपत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. बदल्यासाठी शिक्षकांचे सवंर्ग एक, सवंर्ग दोन, संवर्ग तीन, सवंर्ग ४ असे सवंर्ग पाडण्यात आले आहे. २५ मार्चपासून अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू होणार आहे.
शासन निर्णयाप्रमाणे बदली पात्र शिक्षक....
८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार जिल्हातंर्गत बदली २०१९ साठी खालील शिक्षक पात्र ठरणार आहेत. सवंर्ग १ मध्ये मागील वर्षी बदली झालेले सर्व शिक्षक पुढील तीन वर्ष बदली पात्र असणार नाहीत. परंतु मागील वर्षी नकार दिलेले संवर्ग १ मधील शिक्षक व नव्याने संवर्ग १ मध्ये येणारे शिक्षक यावर्षी बदली करू शकतात. मागील वर्षी ज्या शिक्षकांच्या बदल्या (संवर्ग ४) झालेल्या नाहीत, अशा शिक्षकांच्या व यावर्षी नव्याने बदलीपात्र होणाऱ्या शिक्षकांच्या जागेची मागणी करू शकतील. गतवर्षी झालेल्या बदल्यांमध्ये जे शिक्षक पती-पत्नी यांची बदली ३० किमी पेक्षा जास्त अंतरावर झालेली आहे, असे पती-पत्नी शिक्षकांना यावर्षी संवर्ग २ अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरण चा लाभ मिळणार आहे. अवघड क्षेत्रात तीन वर्ष काम करणाºया शिक्षकांना संवर्ग-३ अंतर्गत बदलीचा विशेष अधिकार मिळणार आहे. ते संवर्ग ४ मधील मागील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना वगळून उर्वरित बदलीपात्र शिक्षकांच्या जागांची मागणी करू शकतील. गतवर्षी बदलीपात्र असतानाही ज्या शिक्षकांना संवर्ग १, २ व ३ किंवा संवर्ग ४ मधील सेवाज्येष्ठ शिक्षकांनी ‘खो’ दिला नसेल असे सर्व शिक्षक व नव्याने होणारे बदलीपात्र शिक्षक (दहा वर्ष सेवा) यावर्षी पात्र असतील. ते आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या जागांची किंवा रिक्त जागांची मागणी करू शकतात.

Web Title: Circular was changed in the district of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.