पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:57 PM2018-06-10T23:57:09+5:302018-06-10T23:57:09+5:30

वसमत तालुक्यातील गिरगांव येथे दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी धूमाकूळ घालून तब्बल आठ जणाना चावा घेऊन जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.

 Bite eight people in a lethal dog | पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा आठ जणांना चावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा: वसमत तालुक्यातील गिरगांव येथे दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी धूमाकूळ घालून तब्बल आठ जणाना चावा घेऊन जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली.
गिरगाव येथे रविवारी पिसाळलेल्या दोन कुत्र्यांनी धुमाकूळ घालूत घराबाहेर खेळत असलेल्या चार मुलांना तसेच घराबाहेर बसलेल्या चार व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले. जखमींना नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिसाळलेले कुत्रे गावात घुसल्याने ग्रामस्थात भीती निर्माण झाली आहे. अथर्व गोविंद कºहाळे, रूद्र गिरी, शैलेष, रामजी नादरे (७०) यासह अन्य चार जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला. या जखमींवर गिरगाव येथील डॉ. सुभाष देशमुख यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे मात्र परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title:  Bite eight people in a lethal dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.