मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:05 AM2019-04-06T00:05:03+5:302019-04-06T00:05:19+5:30

वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Beat up the house; Crime against trio | मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा

मारहाण करून घर पेटवून दिले; तिघांवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजविण्याच्या वादातून मारहाण करून घर पेटवून दिल्याची घटना ४ एप्रिल रोजी रात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारे घडली असून या प्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भेंडेगाव येथे फिर्यादी चंद्रमुनी थोरात यांच्या घरासमोर आरोपीतांनी फटाके वाजविले होते. फटाके घरासमोर का वाजविले? हे आरोपीतांना असे विचारले असता आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादीस थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेच्या प्रकरणातून फिर्यादीच्या घराला आग लावून घर पेटवून दिले. त्यामुळे फिर्यादीचे आर्थिक नुकसान झाले आहे. फिर्यादी चंद्रमुनी थोरात यांच्या तक्रारीवरून कुरूंदा पोलिस ठाण्यात आरोपी चंद्रकांत गायकवाड, पुरभाजी गायकवाड, इंदुबाई गायकवाड या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सपोउपनि शंकर इंगोले हे करीत आहेत.
वसमतहून नांदेडला मांस पुरवणारे रॅकेट; मांस घेऊन जाणारा आॅटो पकडला
वसमत : येथे अवैधरीत्या गोवंशाची कत्तल करून नांदेडला आॅटोद्वारे मांस घेऊन जाणारा आॅटो चेकनाक्यावर कर्मचाऱ्यांनी पकडला. या प्रकाराने वसमत येथून नांदेडला मांस पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी २ लाख ७ हजार रुपयाच्या ऐवजासह एकास अटक केली आहे. येथे गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही वसमत येथे कत्तलखाने चालवले जातात. वसमतहून नांदेडसह विविध शहरात मांस पुरवठा करणारे रॅकेट कार्यरत आहे. मात्र या प्रकाराविरोधात कारवाई कोणी करत नाही. शनिवारी वसमतमध्ये कत्तल केलेल्या गोवंशाचे मांस घेऊन नांदेडला जाणारा आॅॅटो आसेगाव रोडवरील चेकपोस्टवर पकडण्यात आला. आॅटोत ६० किलो मांस असलेले पोते आढळले. २ लाख ७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी सपोनि बळीराम बंदखडके यांनी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. यात गोवंशहत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करून अवैधरित्या कत्तल केलेले गोवंश घेऊन जाणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यात आॅॅटो क्र. एमएच २६ बी.डी. ०३५२ चा चालक शेख जबी शेख खदीर रा. मुशफरशहा वसमत व गोवंश जनावरे खरेदी करून कत्तल करणारे अन्य इसमांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चालकास अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपीचा शोध सुरू आहे.

Web Title:  Beat up the house; Crime against trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.