मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ठेवले नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 03:48 PM2019-02-06T15:48:25+5:302019-02-06T15:49:12+5:30

मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेवून पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे.

On the background of the Chief Minister's visit, the Maratha Shiv Sena workers were reinstated | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ठेवले नजरकैदेत

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा शिवसैनिक सेनेच्या कार्यकर्त्यांना पुन्हा ठेवले नजरकैदेत

Next

हिंगोली : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिल्याने मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेवून पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले आहे. याच ठिकाणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक केला. 

संपूर्ण हिंगोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याची परवानगी भिसे यांना नाकारली होती. त्यामुळे त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना शहर पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवले. छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणास जाता येणार नसल्याने या पुतळ्याच्या कामासाठी आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या राजू पाटील, सुभाष कावरखे, राहुल जाधव, पंकज पोकरे, सुरेश गावंडे, विजय इंगळे यांचा भिसे यांनी सत्कार केला.

भिसे यांच्यासमवेत शाहीन खान पठाण, पंढरीनाथ ढाले, सचिन मिराशे, अनिल शिंदे, संजय भांदरगे, वैजनाथ बोंगाणे, संदीप डांगे, विजयराज पाटील, विजय शिंदे, मंगेश डोल्हारे, बालाजी भिसे, अविनाश चव्हाण, प्रवीण जाधव, लक्ष्मण जाधव, माधव टेकाळे, पिंटू जाधव, गोपाल चव्हाण, गजानन गाडे, गजानन डांगे जवळपास शंभरावर युवकांची उपस्थिती होती. यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भिसे यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Web Title: On the background of the Chief Minister's visit, the Maratha Shiv Sena workers were reinstated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.