कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:16 AM2018-06-04T00:16:00+5:302018-06-04T00:16:00+5:30

रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे.

 18 tons of fertilizer production from the trash | कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

कचऱ्यापासून १८ टन खत निर्मिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : रस्त्यावर अस्ताव्यस्त पडणारा कचरा पालिकेच्या घंटागाडीमुळे कमी झाला असून, दिवसाकाठी शहरातून ९० टन कचरा पालिकेतर्फे उचलून शहरा बाहेर टाकला जात आहे. तर ओला व सुका कचºयावर प्रक्रिया करुन जवळपास १८ टन सेंद्रीय खत निर्मित्तीही करण्यात आलेली आहे.
हिंगोली शहराने विकासाच्या बाबतीत कात टाकली आहे. पूर्वी कचºयाने माखलेले रस्ते आता पूर्वी सारखे दिसत नाहीत. एवढेच काय तर नागरिकही स्वच्छतेचे काही देणे घेणे नसल्यागत वागत होते. यातून शहराचे सौंदर्य पूर्णत: नष्ट होण्याच्या मार्गावर होते. मात्र पालिकेने शहरातील स्वच्छतेकडे लक्ष घातल्याने शहराला सौंदर्य प्राप्त झाले आहे. चार महिन्यांपुर्वी शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारीच एका कंत्राटदाराला दिल्याने, दिवसाकाठी ८४ ते ९० टन कचरा ३२ वाहनाद्वारे शहराबाहेर उचलून नेला जात आहे. आता प्रत्येक नगरातील नागरिकांनाही घंटा गाडीची सवय होऊन बसली आहे. घंटागाडी आली की आपसुकच कचºयाकडे नागरिकांचे लक्ष जात आहे. चार महिन्यात अद्यापर्यंत ३६ हजार ६०० टन कचरा शहरातून बाहेर टाकण्यात आला आहे. त्यातच पालिकेतर्फे शहरात जागो- जागी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्यातही कचरा टाकला जातो. मात्र त्या कचरा कुंड्या वेळीच रिकाम्या केल्या जात नसल्याने रस्त्यावर कचरा सांडत असल्याचे चित्र दिसून येते.
शहरातील विविध नगरातील कचरा घंटागाडीद्वारे उचलला जात असला तरी यातील बºया पैकी कचरा गाड्या ढकलस्टार्ट झालेल्या आहेत. तसेच काही वाहनांच्या तर फालक्यातून कचराही रस्त्यावर गळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कचरा उचलणाºया वाहनांची दुरुस्तीकी करणे तेव्हढेच
गरजेचे आहे. तसेच ढकलस्टार वाहने असल्याने कोठेही बंद पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध नगरातील नागरिकांना धक्का देऊन वाहने सुरु करण्यास मदत करावी लागत आहे. गाडीची सवय झालेली असल्याने तीची दुरुस्तीही करणे गरजेचे आहे.
शहरातून उचलण्यात येणाºया कचºयावर प्रक्रिया करुन शेंद्रीय खत निर्मित्ती करणे सुरु आहे. यंदा शेतकºयांसाठी हे खत विक्रीस उपलब्ध केले जाणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.

Web Title:  18 tons of fertilizer production from the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.